बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मुंबई सगळ्यात वाईट शहर कारण…”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची संतप्त पोस्ट, म्हणाली, “बँडस्टँड, हाजीअलीसारखी ठिकाणं…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 9, 2024 | 12:23 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
marathi actress manava naik shared social media post on mumbai’s infrastructure and pollution see the details

"मुंबई सगळ्यात वाईट शहर कारण...", सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची संतप्त पोस्ट, म्हणाली, "बँडस्टँड, हाजीअलीसारखी ठिकाणं..."

हल्ली सोशल मीडियाद्वारे अनेकजण आपपली मते व्यक्त करत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते अनेक सामाजिक विषयांवर भाष्य करत असतात. मराठी मनोरंजन विश्वात असे अनेक कलाकार आहेत, जे सोशल मीडियाद्वारे त्यांची मतं मांडत असतात. यांपैकीच एक कलाकार म्हणजे अभिनेत्री मनवा नाईक. मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून मनवा नाईकला ओळखले जाते. फक्त अभिनेत्रीच नव्हे तर एक दिग्दर्शिका व निर्माती म्हणूनही मनवाने मनोरंजन सृष्टीत आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. (Manava Naik On Instagram)

मनवाने आतापर्यंत अनेक आघाडीच्या चित्रपटांत काम केले आहे. फक्त अभिनेत्री म्हणून नव्हे तर एक यशस्वी निर्माती म्हणूनही मनोरंजन विश्वात तिची ख्याती आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व कामानिमित्त काही माहिती शेअर करत असते. अशातच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक फोटो शेअर करत तिची खंत व्यक्त केली आहे. मुंबईत हल्ली ठिकठिकाणी खोदकाम आणि बांधकाम केले जात आहे. त्यामुळे साहजिकच मुंबईत दिवसेंदिवस ध्वनी आणि वायु प्रदूषण वाढत आहे. मुंबईमध्ये प्रगतीच्या नावाखाली ह्रास होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Manava Arun Naik (@manava.naik)

आणखी वाचा – Bigg Boss 17 : नवऱ्याला लाथ मारल्यानंतर सासूने अंकिता लोखंडेला सुनावलं, अभिनेत्रीच्या आईला फोन करत संस्कारही काढले, म्हणाल्या “तुम्ही तुमच्या नवऱ्याला…”

यावर मनवाने तिच्या सोशल मीडियाद्वारे नाराजी व्यक्त करत एक पोस्ट लिहिली आहे. यात तिने असे म्हटले आहे की, “हे पूर्णपणे निराशाजनक आहे परंतु वायू प्रदूषण, रस्ते, बांधकाम, रहदारी आणि सौंदर्यशास्त्राच्या दृष्टीने मुंबई आता सर्वात वाईट शहर आहे. धुळीने थर लावलेल्या, इमारतींचे कुरूप ब्लॉक्स वरच्या बाजूला रचले जात आहेत. नवीन पायाभूत सुविधांच्या सबबीखाली वर्षानुवर्षे खोदकाम केले जाते.” यापुढे तिने असं म्हटले आहे की, “बँडस्टँड, हाजी अली ही ठिकाणे आता पूर्वीसारखी  राहिली नाहीत. यानंतर आता रेस कोर्सचाही नंबर आहे. त्यामुळे हे सगळं पाहून मन दुखावलं गेलं आहे.” तसेच या खाली तिने ‘या पोस्टचा राजकारणाशी संबंध नाही’ अशी एक तळटीप दिली आहे.

आणखी वाचा – बॉलिवूडमध्ये लगीनघाई! आयरा-नुपूर नंतर ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्रीदेखील अडकणार विवाहबंधनात, तारीखही आली समोर अन्…

दरम्यान, या पोस्टखाली अनेकांनी कमेंट्सद्वारे प्रतिक्रियाही दिल्या आहेत. “विकासाच्या नावाखाली आपण केवळ इमारतीचा बांधत आहोत आणि हा विकास आपल्याला एका अस्वास्थ्य जीवनाकडे नेत आहे, तुमच्यासारख्या लोकांकडून अशा सामाजिक समस्यांबद्दल बोलले जाणे हे खूपच चांगले आहे, मुंबई आणि कोकण किनारपट्टीची शांतता व हवामान चक्र बिघडवणाऱ्या सत्ताधारी सरकारचे आभार” अशा अनेक संमिश्र कमेंट्सद्वारे नेटकऱ्यांनी या फोटोखाली आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.  

Tags: manava naikmarathi actressmarathi entertainmentmarathi entertainment newsMarathi newsमनवा नाईकमराठी अभिनेत्रीमराठी बातमीमराठी मनोरंजनमराठी मनोरंजन बातमी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Next Post
Vaibhav Mangle Video

Video : वैभव मांगलेंनी मुलांसाठी स्वतः बनवले पराठे, संपूर्ण रेसिपीही सांगितली, अभिनेत्याच्या साधेपणाचं सर्वत्र कौतुक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.