मनोरंजन विश्वात सध्या जोरदार लगीनघाई सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. २०२३ या वर्षात मराठीसह हिंदी कालाविश्वात अनेकांनी आपल्या जोडीदाराबरोबर विवाहगाठ बांधली. त्यानंतर आता नव्या वर्षाच्या सुरुवातीलादेखील अनेक कलाकार विवाहबंधनात अडकत आहेत. त्यापैकी एक लोकप्रिय कपल म्हणजे आमिर खानची लेक आयरा खान व बॉयफ्रेंड नुपूर शिखरे. आयरा-नुपूर यांच्या लग्नाला सुरवात झाली आहे. मुंबईत नोंदणी पद्धतीने लग्न केल्यानंतर लवकरच हे दोघे उदयपूरमध्ये शाही पद्धतीने एकमेकांशी पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकणार आहेत. (Rakul Singh And Jackky Bhagnani Wedding)
अशातच आता बॉलिवूडमधील आणखी एक लोकप्रिय जोडी लग्न करणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगताना पाहायला मिळत आहेत. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि अभिनेता जॅकी भगनानी हे दोघेदेखील यंदाच्या नवीन वर्षात लग्नबंधनात अडकणार आहेत. रकुल व जॅकी येत्या फेब्रुवारी महिन्यात गोव्यात लग्न करणार असल्याचे म्हटले जात आहे. रकुल प्रीत आणि जॅकी भगनानी २२ फेब्रुवारी रोजी गोव्यात लग्न करणार आहेत. अर्थात रकुल किंवा जॅकी या दोघांपैकी लग्नाबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. पण त्यांच्या लग्नाच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आले आहे.
आणखी वाचा – Video : “मला त्रास देऊ नको…”, क्रांती रेडकरवर भडकले समीर वानखेडे, तरीही व्हिडीओ शूट करत राहिली अन्…
रकुल-जॅकी यांना त्यांचं लग्न अतिशय खासगी पद्धतीने करायचं आहे. त्याआधी सध्या दोघंही सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहेत. जॅकी त्याच्या बॅचलर पार्टीसाठी बँकॉक-थायलंडमध्ये आहे, तर अभिनेत्री रकुलदेखील थायलंडमध्ये आहे आणि सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. रकुल व जॅकी या दोघांच्या लग्नाची तारीख अनेकदा समोर आल्याच्या अफवा उडाल्या होत्या. मागील वर्षीही दोघांच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या होत्या, पण अभिनेत्रीने या चर्चा नाकारल्या होत्या.
दरम्यान, रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी या दोघांनी त्यांचं नातं कधीही लपवलं नाही. दोघं २०२१ पासून एकमेकांना डेट करत आहेत. अशातच २०२४ या नवीन वर्षात त्यांच्या लग्नाच्या चर्चा पुन्हा एकदा रंगताना पाहायला मिळत आहेत. अशातच बॉलिवूडमधील आणखी एक कपल विवाहबंधनात अडकणार असल्यामुळे रकुल व जॅकी यांच्या चाहत्यांना त्यांच्या लग्नाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे हे दोघे कधी लग्न करणार याची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत.