शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 : अंकिता लोखंडे व नील भट्टमध्ये तुफान भांडणं, अभिनेत्रीच्या अंगावर ओरडत धावून गेला अन्…; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 27, 2023 | 1:19 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
bigg boss 17 actress ankita lokhande and neil bhatt fight new video on social media

Bigg Boss 17 : अंकिता लोखंडे व नील भट्टमध्ये तुफान भांडणं, अभिनेत्रीच्या अंगावर ओरडत धावून गेला अन्...; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

‘बिग बॉस १७’ हा शो दिवसेंदिवस अधिकच लोकप्रिय होत चालला आहे.  घरातील टास्कमुळे आणि या टास्कच्या दरम्यान स्पर्धकांमधील होणाऱ्या वादामुळे हा शो आणखीनच रोमांचक होत आहे. दरम्यान या घरात स्पर्धकांमध्ये नेहमीच काहीना काही कारणांवरून वाद होत असतात. अशातच आता अभिनेत्री अंकिता लोखंडे व नील भट्ट यांच्यात वाद झाल्याचे पाहायला मिळाले आहे. नुकताच या शो चा एक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ज्यात ते दोघे एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. (Bigg Boss 17 : New Promo Out On Social Media)

घरातील ‘नॉमिनेशन स्पेशल’ या टास्कमध्ये नील नॉमिनेट करतो. हे पाहून अंकिता नीलवर आरोप करते आणि त्याला ‘फट्टू’ (घबराट) म्हणून डिवचते. अंकिताच्या तोंडून ‘फट्टू’ हा शब्द ऐकून नीलला भयंकर राग येतो आणि तो तिची नक्कल करू लागतो. यानंतर अंकिता सोफ्यावर जाऊन बसते आणि तिच्यापाठोपाठ नीलसुद्धा तिच्यासमोर येऊन बसतो. पुढे सोफ्यावर जाऊन बसल्यानंतर त्यांच्यातील वाद सुरूच राहतात. ते एकमेकांना चिडवत असतात. यातून त्यांच्यात भांडण होते.  

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

आणखी वाचा – …अन् थेट लंडनच्या पॅलेसमध्ये बसून वैशाली सामंतने खाल्ली मिसळ, फोटो शेअर करत म्हणाली, “ना नाशिक, कोल्हापूर अन्…”

यावेळी अंकिता नीलला “माझ्याशी लांबून बोल, तुझ्या तोंडातून दुर्गंधी येतेय” असं म्हणत चिडवते. त्यावर नीलदेखील “तुझ्याकडून खोटारडेपणाची दुर्गंधी येतेय” असं म्हणतो. यादरम्यान त्यांच्यात जोरदार भांडण होते. अंकिता नीलवर “गप्प बस. निघ इथून” असं ओरडत त्याला गप्प बसण्यास सांगते. मात्र नील तिचं काही ऐकायला तयार नसतो. यावर तोही “तुझा आवाज माझ्यापेक्षा जास्त आहे” असं म्हणत तिच्यावर मोठ्या आवाजात ओरडतो.

आणखी वाचा – राजकुमार कोहली यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात सनी देओल हसत राहिला अन्…; व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी, म्हणाले, “निर्लज्ज मृत व्यक्तीच्या…”

दरम्यान या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी कमेंट्स करत त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करत असे म्हटले आहे की, “नील हा कॅमेऱ्यासमोर येण्यासाठी मुदाम अंकितला टार्गेट करत आहे.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने “प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तो अंकिताबरोबर भांडण करत आहे” असं म्हणत त्याच्यावर टीका केली आहे. त्यामुळे या नॉमिनेशन टास्कदरम्यान त्यांच्यात नेमकं काय होतं? हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.  

Tags: ankita lokhandebigg bossbigg boss 17bollywood newsentertainment newsNeil Bhatt
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Niranjan Kulkarni Wedding Video
Entertainment

‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, लूकची चर्चा

जून 6, 2025 | 11:42 am
Priya bapat online shopping experience
Entertainment

प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

जून 6, 2025 | 11:07 am
muzammil ibrahim  On deepika padukone
Entertainment

तिने प्रपोज केलं, दोन वर्ष रिलेशनमध्ये होतो आणि…; दीपिका पदुकोणच्या पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडचा खुलासा, कोण आहे मुजम्म‍िल इब्राहिम?

जून 6, 2025 | 11:02 am
Hina Khan Wedding
Entertainment

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कामावर परतली हिना खान, अगदी सिंपल लूकमध्ये दिसली, एकटी दिसताच नेटकरी म्हणाले, “नवरदेव कुठे आहे?”

जून 6, 2025 | 10:30 am
Next Post
Jhimma 2 Box Office Collection

'झिम्मा २'ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड, प्रेक्षकांचाही तुफान प्रतिसाद, चार दिवसांतच कमावले इतके कोटी

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.