बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक म्हणजे अभिनेता सनी देओल. त्याने आपल्या उत्कृष्ट अभिनयातून सगळ्यांची मनं जिंकली. तो आपल्या हटके अंदाजाने सगळ्यांच लक्षवेधून घेत असतो. याचवर्षी त्याचा ‘गदर २’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बरीच कमाई करत बॉक्स ऑफिसवर नवीन रेकॉर्ड बनवले. या चित्रपटामुळे सनी बराच चर्चेत होता. पण सध्या तो वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. नुकतंच बॉलिवूडचे ज्येष्ठ चित्रपट निर्माते व अरमान कोहली याचे वडील राजकुमार कोहली यांचं निधन झालं. त्यानंतर मुंबईत त्यांच्यासाठी प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यामध्ये बॉलिवूडमधील बऱ्याच दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली. त्यात अभिनेता सनी देओलही पोहोचला होता. त्यादरम्यानचा सनीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्याला पाहून नेटकरी चांगलेच संतापलेले दिसत आहेत. (sunny deol troll for laughing)
मुंबईतील जुहू याठिकाणी राजकुमार कोहली यांच्यासाठी श्रद्धांजली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राजकुमार यांना श्रद्धांजली देण्यासाठी बऱ्याच जणांनी हजेरी लावली. अभिनेता सनी देओल व अभिनेते दारा सिंहदेखील या कार्यक्रमात उपस्थित असलेले पाहायला मिळाले.
‘व्हुमप्ला’ यांनी चित्रीत केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत अभिनेता प्रार्थना सभेत हसताना दिसत आहे. एक व्यक्ती सनीच्या कानात काहीतरी बोलताना दिसत आहे. जे ऐकून सनी हसताना दिसला. दारा सिंह पण त्याच्याबरोबर हसताना दिसले. तर दुसऱ्या बाजूला अरमान कोहली दुसऱ्या बाजूला दुःखी उभा होता. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमुळे अभिनेता बराच ट्रोल होत आहे. त्यानंतर अरमानने सनीला गाडीपर्यंत सोडलं.
सनी देओलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, तो बराच ट्रोल झाला. एका नेटकऱ्याने कमेंट केली की, ‘निर्लज्ज, मृत व्यक्तीच्या मुलासमोर असं हसतात’ तर दुसऱ्या नेटकऱ्याने, ‘मरणावर त्यांना बरंच हसायला येत आहे’. तर आणखी एका नेटकऱ्याने लिहीलं की, ‘सनी विसरला वाटतं की तो एक व्यक्तीच्या श्रद्धांजली कार्यक्रमाला आला आहे’, असं म्हणत नेटकऱ्यांनी सनीला चांगलंच ट्रोल केलं आहे.