मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘झिम्मा २’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड, प्रेक्षकांचाही तुफान प्रतिसाद, चार दिवसांतच कमावले इतके कोटी

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 27, 2023 | 2:04 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Jhimma 2 Box Office Collection

'झिम्मा २'ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड, प्रेक्षकांचाही तुफान प्रतिसाद, चार दिवसांतच कमावले इतके कोटी

बॉलिवूड चित्रपटांपाठोपाठ मराठी चित्रपटांसाठीही प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. ‘वेड’, ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटांच्या अभूतपूर्व यशानंतर मराठी चित्रपटांची रांग लागली आहे. अशातच सध्या ‘झिम्मा २’ चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. ‘झिम्मा २’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यात व्यस्त आहे. चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षक झिम्मा २ चित्रपट पाहण्यास गर्दी करताना दिसत आहेत. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने उत्तम गल्ला जमवलेला पाहायला मिळत आहे. (Jhimma 2 Box Office Collection)

हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु असताना या चित्रपटाने दोन दिवसांत किती कलेक्शन केलं हे नुकतंच समोर आलं आहे. ‘झिम्मा २’मध्ये सात बायकांची मैत्री अधिकच घनिष्ट पाहायला मिळाली. सात मैत्रिणी व त्याच्या सात तऱ्हा चित्रपटात पाहायला मिळत आहे. प्रत्येकीची प्रेम व्यक्त करण्याची भाषा वेगळी असलेली चित्रपटात पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – Bigg Boss 17 : अंकिता लोखंडे व नील भट्टमध्ये तुफान भांडणं, अभिनेत्रीच्या अंगावर ओरडत धावून गेला अन्…; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगलीच कमाई केली असल्याचं पाहायला मिळत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन अवघे चार दिवस झाले आहेत. चार दिवसांत या चित्रपटाने करोडोंचा गल्ला जमवला आहे. ‘Sacnilk Team ‘ या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, ‘झिम्मा २’ चित्रपटाने पहिल्या दिवशी १ कोटी २० लाख रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर आता चित्रपटाचं दोन दिवसाचं कलेक्शन समोर आलं आहे. ‘झिम्मा २’ या चित्रपटाने दोन दिवसांत ६ कोटी रुपयांची कमाई केली आहे. रिंकू राजगुरू हिने नुकतीच एक इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. यांत रिंकूने नेमकी चित्रपटाने किती कमाई केली आहे याबाबत स्पष्ट केले आहे. ४ कोटी ७७ लाख रुपये इतकी कमाई चित्रपटाने केली असल्याचं रिंकूच्या पोस्टवरून समोर आलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru)

आणखी वाचा – खेडेगावात घर, दोन वेळेचं जेवणही नव्हतं अन्…; आता गौरी पगारे ठरली ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ची महाविजेती, एकूण रक्कम मिळाली तब्बल…

‘झिम्मा २’ चित्रपटाच्या टिझर, ट्रेलरने चांगलंच धुमाकूळ घातला होता. त्यांनतर चित्रपटातील ‘मराठी पोरी’ या गाण्याने प्रेक्षकांना अक्षरशः साऱ्यांना थिरकायला भाग पाडलं. आणि आता हा चित्रपटचं चित्रपटगृहांमध्ये भरघोस कमाई करताना पाहायला मिळतोय. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ चित्रपटात चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे, सिद्धार्थ चांदेकर पाहायला मिळत आहेत.

Tags: entertainmentjhimmajhimma 2jhimma 2 box office collectionmarathi actormarathi actressmarathi movie
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
deepfake video goes viral

कतरिना कैफ, रश्मिका मंदानानंतर आलिया भट्टचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल, अश्लील हातवारे करतानाचं दृश्य समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.