बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“सहा लक्ष्मींच्या…” ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाला दोन महिने पूर्ण झाल्यानिमित्त केदार शिंदेंची पोस्ट चर्चेत, म्हणाले, “नवं काम करताना मला…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑगस्ट 31, 2023 | 1:31 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Baipan Bhari Deva completes Two Months

"सहा लक्ष्मींच्या…" 'बाईपण भारी देवा' चित्रपटाला दोन महिने पूर्ण झाल्यानिमित्त केदार शिंदेंची पोस्ट चर्चेत, म्हणाले, "नवं काम करताना मला…"

दिग्दर्शक केदार शिंदे यांचा ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट बराच चर्चेत राहिला. चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. अजूनही काही चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट सुरु असून त्यालादेखील तितकाच प्रतिसाद मिळत आहे. सहा बहिणींच्या व एकूणच महिलांच्या भावविश्वावर फिरणाऱ्या या चित्रपटाच्या कथानकावर महिलांसह पुरुष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. शिवाय, अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा परब या अभिनेत्रींच्या सुंदर अभिनयाचे प्रेक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव झाला होता. (Baipan Bhari Deva completes Two Months)

‘बाईपण भारी देवा’ चित्रपट ३० जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता, ज्याला नुकतेच दोन महिने पूर्ण झाले आहे. यानिमित्त दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये केदार यांच्यासह चित्रपटातील सहा अभिनेत्री दिसत आहे.

या फोटोसह लिहिलेल्या पोस्टमध्ये केदार शिंदे म्हणाले, “काल ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट प्रदर्शित होऊन २ महिने पुर्ण झाले, या दोन महिन्यांत खुप काही मिळालं. तुम्हा रसिकांच्या मनात घर करता आलं यापेक्षा अहो भाग्य ते काय दुसरं? या सहा लक्ष्मींच्या पावलाने चित्रपटगृहात गर्दी सुरू झाली आणि त्यानंतर चित्रपटगृह तुडुंब भरून वाहतायत. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने घवघवीत यश या सिनेमाला लाभलं. मी या सगळ्याचा एक भाग आहे यापेक्षा आनंद तो काय?”

हे देखील वाचा – छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार विकी कौशल?, चित्रपटाच्या तयारीला सुरुवात

“अजूनही काही ठिकाणी चित्रपट सुरू आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गावात मंगळागौरीचे फेर धरले जातायत. सहा लक्ष्मींच्या साड्या, दागिने याचे ट्रेन्ड सर्वत्र दिसून येतायत. श्री सिद्धिविनायकाचा महाप्रसाद मिळाला. पुढे नवं काम करताना मला या जबाबदारीची जाणीव सतत होत राहणार. त्यामुळे चांगलंच देण्याचा माझा प्रयत्न असेल.” असं केदार शिंदे या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

हे देखील वाचा – मेहंदी, लगीनघाई अन्…; मराठमोळ्या अभिनेत्रीच्या घरी लगीनघाई सुरु, हातावरील मेहंदी रंगण्यास झाली सुरुवात

View this post on Instagram

A post shared by Kedar Shinde (@kedarshindems)

‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाने केवळ महाराष्ट्रातच नाही, तर देश-विदेशातील प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली आहे. विशेष म्हणजे, मराठीसह हिंदीतील अनेक कलाकार व विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनीसुद्धा चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे. चित्रपटाच्या या यशामागे दिग्दर्शक केदार शिंदे यांचा मोलाचा वाटा आहे. (Baipan Bhari Deva completes Two Months)

Tags: baipan bhari devakedar shinde
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Deepali Sayed Home Coming
Entertainment

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, “उंबरठ्यावर…”

एप्रिल 22, 2026 | 9:55 am
Next Post
Sukh Mhanje Nakki Kay Asta Serial Troll

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेचा नवा प्रोमो पाहून मालिका होतेय ट्रोल, “तुमचा लेखक कुठे आहे?” नेटकऱ्यांनी केला सवाल, म्हणाले…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.