अनेक प्रेक्षक हे मालिकांचे चाहते असतात. मालिका सुरु झाल्यापासून ते प्रत्येक मालिकेवर, मालिकेतील पात्रांवर प्रेम करतात. कालांतराने जेव्हा मालिकांमध्ये नवनवीन ट्विस्ट येऊ लागतात तेव्हा हे ट्विस्ट बरेचदा प्रेक्षकांच्या अंगवळणी पडत नाहीत. आणि मग प्रेक्षक व मालिका यांच्यात ताटातूट होते. मालिकेत आलेल्या रंजक वळणांमुळे एकत्र मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडते वा त्यांच्या मनातून उतरते. असंच काहीस घडलं आहे स्टार प्रवाह वाहिनीवरील एका मालिकेसह. (Sukh Mhanje Nakki Kay Asta Serial Troll)
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेच्या नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोवर नेटकऱ्यांनी जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेचा नवा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करायला सुरुवात केली आहे. ‘काय फालतूगिरी लावली आहे’, ‘आता खूपच अती झालंय’, ‘मालिका बंद करा’, अशा प्रतिक्रिया देत मालिकेला ट्रोल केलं जात आहे.
मालिकेच्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये शालिनीचा नवा डाव रंगलेला पाहायला मिळत आहे. शालिनी, देवकी व मल्हार जयदीपला एका खड्ड्यात पुरताना दिसत आहेत. यावेळी शालिनी मनातल्या मनात म्हणते की, ‘या टाइमला नशीबाने मला साथ दिली गौरी. जयदीप भावपूर्ण श्रद्धांजली तुला.’ तर दुसऱ्या बाजूला जयदीपच्या शोधात गौरी गणपती बाप्पाकडे हात जोडून प्रार्थना करताना दिसत आहे. प्रार्थना करताना गौरीला एक छोटी मुलगी येऊन म्हणते की, ‘बाप्पाचा उंदीर मामा मार्ग दाखवायला आहे. उंदीर मामा तुचं गौरीला आता मार्ग दाखवं बरं.’ तेवढ्यात एक छोटा पांढरा उंदीर येतो. मालिकेचा हा गंमतशीर बनवलेला प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी त्याला चांगलंच ट्रोल केलं आहे.
एका नेटकऱ्याने प्रोमोखाली कमेंट करत म्हटलं आहे की, ‘तुमच्या मालिकेचा लेखक कुठे आहे? त्याचे पाय धरावेसे वाटतायत. देवाला पण नाही सोडत. ‘रंग माझा वेगळा’पेक्षा ही जास्त फालतू मालिका आहे. आता ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेनंतर हिचा नंबर बंद करण्यासाठी प्लिज लावा आणि आमच्यावर फार मोठे उपकार करा.’ तर आणखी एका नेटकऱ्याने लिहीलं की, ‘अरे काय ही मालिका… किती वेळा जयदीप मरतो आणि किती वेळा जीवंत होतो…फालतू.’
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असत’ मालिकेचा प्रोमो पाहून नेटकऱ्याची ही मालिका लवकरात लवकर बंद करण्याची मागणी सुरु केली आहे. मालिकेत आलेला हा टर्निंग पॉईंट आता काय वळण घेणार हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.