सिनेसृष्टीत पुन्हा एकदा लग्नाचे वारे वाहू लागले आहेत. बऱ्याच कलाकार मंडळींनी आमचं ठरलं म्हणत खुशखबर शेअर केली आहे. कलाकारांच्या खऱ्या आयुष्याबद्दल, त्यांच्या खऱ्या जोडीदाराबद्दल जाणून घ्यायला चाहत्यांना नेहमीच आवडत. चाहत्यांसाठी हे कलाकार मंडळी त्यांच्या खासगी आयुष्यातील बऱ्याच गोष्टी ते सोशल मीडियावरून शेअर देखील करतात. अशातच आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीने लग्नबंधनात अडकणार असल्याची गुडन्यूज शेअर केली. (Meera Joshi Mehandi)
मराठी मनोरंजन विश्वातही असे अनेक कलाकार आहे, जे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. कलाकारांची ही यादी दिवसेंदिवस वाढत असताना आता आणखी एका नावाचा यात समावेश झाला आहे. ती म्हणजे अभिनेत्री मीरा जोशी. काही दिवसांपूर्वी तिने तिच्या बॉयफ्रेंडबरोबरचे फोटोशूटचे फोटो शेअर करत त्यांच्या नात्याबाबत खुलासा केला होता. सोशल मीडियावरून प्रेमाची कबुली देत मीरा लवकरच नृत्य दिग्दर्शक नेरुल वारुळेसह विवाहबंधनात अडकणार आहे.
मीरा व नेरुल येत्या ५ सप्टेंबर रोजी विवाहनबंधनात अडकणार असून हे दोघे नेमकं कुठे लग्न करणार, कश्यारीतीने करणार, हे मात्र समोर आलेले नाही. अशातच आता मीराच्या घरी लगीनघाई सुरु झाल्याच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. मीराच्या घरी लगीनघाईला सुरुवात झाली असून तिच्या घरातील मेहंदी सोहळ्याने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मेहंदी काढतानाचा व्हिडीओ अभिनेत्रीने सोशल मीडियावरून शेअर केला आहे.
लग्न सोहळ्याला काही दिवसच बाकी राहिले असल्याने सध्या मीराच्या घरी लग्नाची धामधूम सुरु झाली आहे. मीरा जोशीने मेहंदी सोहळ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. मीराच्या हातावरील सुंदर मेहंदीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
अभिनेत्री मीरा जोशीने काही दिवसांपूर्वी स्वतःचे घर घेतले असून त्याचे फोटोसही तिने पोस्ट केले होते. लग्नाच्या खुशखबरसह तिने घर घेतल्याची गोड बातमी देऊन ही चाहत्यांना सुखद धक्का दिला होता.