शुक्रवार, मार्च 6, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार विकी कौशल?, चित्रपटाच्या तयारीला सुरुवात

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 31, 2023 | 1:11 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Vicky playing role of chhatrapati sambhaji maharaj?

Vicky playing role of chhatrapati sambhaji maharaj?

आपल्या अभिनयाच्या बळावर बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्यापैकी एक म्हणजे विकी कौशल. त्याने आजपर्यंत विविध भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सध्या तो ‘जरा हटके जरा बचके’, ‘सरदार उधम’ यांसारख्या चित्रपटांमुळे बराच चर्चेत आहे. नुकताच त्याच्या ‘सरदार उधम’ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. तो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. नुकताच तो ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ या चित्रपटातील गाण्याच्या प्रमोशनावेळी माध्यमांसमोर आला होता. त्यावेळी त्याचा वेगळा अंदाजात पहायला मिळाला. यात त्याने दाढी वाढवलेली दिसली. त्यामुळे तो लवकरच एका ऐतिहासिक भूमिकेत दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. (Vicky playing role of chhatrapati sambhaji maharaj?)

लक्ष्मण उतेरकर ‘छावा’ या छत्रपती संभाजी महाराजांवरील हिंदी चित्रपटाची तयारी करत आहेत. या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजन तर लेखन ऋषी विरमणी यांनी केलं आहे. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उतेकरांनी छत्रपती संभाजी महाराजांवरील चित्रपट दिग्दर्शित करत असल्याची माहिती दिली आहे. विकी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार असल्याचं म्हटलं जात आहे. हा चित्रपट शंभूराजांच्या पराक्रमावर व त्यांच्या त्यागावर आधारित चित्रपट असणार आहे. विकीने या अगोदर ‘तख्त’ व ‘इमोर्टल अश्र्वत्थामा’ चित्रपटातही काम केलं आहे. त्यानंतर तो पुन्हा ऐतिहासिक चित्रपटात झळकणार आहे.

वाचा – विकीची या चित्रपटासाठी तयारी झाली सुरू?(Vicky playing role of chhatrapati sambhaji maharaj?)

View this post on Instagram

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

आणखी वाचा – Video : प्रसिद्ध दिग्दर्शकाने प्रियांका चोप्राच्या बहिणीला केलं किस, व्हिडिओ पाहून नेटकरीही भडकले

विकीच्या ‘उरी’ चित्रपटातील भूमिकेनंतर लक्ष्मण उतेकरांची या चित्रपटांच्या भूमिकेसाठी पहिली पसंती होती. या भूमिकेसाठी त्याला विचारलं असता स्क्रीप्ट वाचल्यानंतर विकीनेही या भूमिकेसाठी होकार कळवला आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाची कथा लिहून तयार असून लवकरच चित्रपटाच्या चित्रीकरणालाही सुरुवात होणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

आणखी वाचा- “कलाकार मुर्ख आणि…”, ‘द कश्मीर फाइल्स’चे विवेक अग्निहोत्री बॉलिवूडवर भडकले. म्हणाले, “मी अधिक हुशार कारण…”

दिग्दर्शक लक्षण उतेरकर ‘मिमी’, ‘लुका छुपी’ यांनी यांसारखे चित्रपट केले आहेत. त्यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. त्यांची महाराष्ट्राची संस्कृती व इतिहास यांचा चांगलाच अभ्यास आहे. शिवाय ‘छावा’ चित्रपटासाठी अभ्यास संशोधनही करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितलं. आता या चित्रपटाच्या रुपात त्यांनी मोठी जबाबदारी घेतली आहे. हा चित्रपट नक्कीच एक बिग बजेट चित्रपट असणार आहे.

Tags: bollywood newschhatrapati sambhaji maharajhindi actornew movievicky kaushal
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Varsha Usgaonkar cheated in 47 lakh investment scam
Entertainment

प्रसिद्ध अभिनेत्रीची बिल्डरकडून मोठी फसवणूक, ४७ लाखांचा गंडा, नेमकं प्रकरण काय?

मार्च 5, 2026 | 5:17 pm
Anurag Doval UK07 Rider crying in YouTube video
Entertainment

आई-वडिलांकडून छळ, भावाने सगळंच हडपलं अन्…; ‘बिग बॉस १७’ फेम स्पर्धकाची वाईट अवस्था, म्हणाला, “आत्महत्या…”

मार्च 5, 2026 | 12:43 pm
Mugdha Vaishampayan Puranpoli Video
Entertainment

Video : सासूबाईंच्या मार्गदर्शनाखाली मुग्धा वैशंपायनने बनवल्या पुरणपोळ्या, नवऱ्याच्या कमेंटने वेधलं लक्ष

मार्च 5, 2026 | 11:59 am
Rashmika Mandanna Red Saree
Entertainment

लाल रेशमी साडी, पांढरा रेशमी कुर्ता आणि…; हैदराबाद रिसेप्शनमधील रश्मिका-विजयच्या लूकने वेधलं लक्ष, साऊथ इंडियन लूकमध्ये दिसले

मार्च 5, 2026 | 10:43 am
Next Post
Meera Joshi Mehandi

मेहंदी, लगीनघाई अन्…; मराठमोळ्या अभिनेत्रीच्या घरी लगीनघाई सुरु, हातावरील मेहंदी रंगण्यास झाली सुरुवात

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.