शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“डोकं जमिनीवर आणि पाय…”, दिग्दर्शक केदार शिंदेंची लेकीसाठी पोस्ट, सल्लाही दिला, म्हणाले, “हे दिवसही सरतील पण…:

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 18, 2023 | 11:47 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Kedar Shinde On Sana Shinde

"डोकं जमिनीवर आणि पाय…", दिग्दर्शक केदार शिंदेंची लेकीसाठी पोस्ट, सल्लाही दिला, म्हणाले, "हे दिवसही सरतील पण…:

‘अगं बाई अरेच्चा’ या चित्रपटात संजय नार्वेकर यांच्या मनातला आवाज ऐकणारी छोटी मुलगी नेमकी कोण या प्रश्नाचं उत्तर आता साऱ्यांसमोर आलंय. सुप्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांची लेक सना शिंदे. अगं बाई अरेच्चा या चित्रपटात सनाचा अगदी छोटा असलेला रोल भाव खाऊन गेला. त्यानंतर सना झळकली ती तिच्या आजोबांच्या म्हणजेच ‘शाहीर साबळे’ यांचा जीवनपट “महाराष्ट्र शाहीर” या चित्रपटात. ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटामुळे सनाला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. (Kedar Shinde On Sana Shinde)

‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटातील बहरला मधुमास या गाण्याची क्रेज आजही कमी झालेली नाही. सना व अंकुश यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्याने लाखो दिलांच्या मनावर राज्य केलं. या गाण्यामुळे सना घराघरांत पोहोचली. तब्बल २० वर्षांनी सनाने रुपेरी पडद्यावर पाऊल टाकलं आणि प्रेक्षकांच्या मनात घर केलं. ‘महाराष्ट्र्र शाहीर’ या चित्रपटात सनाने शाहिरांच्या पत्नीची भूमिका साकारली होती.

आणखी वाचा – ड्राइव्ह करताना ट्रोल झाल्यानंतर मुग्धा-प्रथमेशचा नवा व्हिडीओ, पुन्हा गाडीत गाणं गाताना पाहून नेटकरी म्हणाले, “ड्रायव्हिंगवर लक्ष…”

प्रेक्षकांच्या लाडक्या सनाचा आज वाढदिवस आहे. सनाच्या वाढदिवसानिमित्त तिचे वडील दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केलेली पोस्ट लक्ष वेधून घेत आहे. सनाच्या वडिलांनी ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटातील तिचा एक फोटो पोस्ट करत म्हटलं आहे की, “वाढदिवसाच्या शुभेच्छा. मोठी हो. यशस्वी हो. डोकं जमिनीवर आणि पाय जमिनीच्या आत राहू देत. यशात आणि अपयशात एकच लक्षात ठेव हे दिवसही सरतील. श्री स्वामी कृपा सदैव राहो. तेच सांभाळतील तुला.” असं म्हणत लेकीला शुभेच्छा देत शुभाशीर्वाद दिले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Kedar Shinde (@kedarshindems)

आणखी वाचा – ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या नव्या प्रोमोनुसार “मधुभाऊंची सुटका होणार का?”, सायलीला मिळणार जोगतीणी कडून उत्तर

केदार शिंदे यांनी लेकीच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या पोस्टवर अभिनेत्री अमृता खानविलकरने कमेंट करत सनाला शुभेच्छा दिल्या आहेत. केदार शिंदे यांनी ‘महाराष्ट्र्र शाहीर’, ‘बाईपण भारी देवा’ यांसारख्या हिट झालेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांच्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने तर बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला.

Tags: arathi actorbaipan bhari devaentertainmentkedar shindemaharashtra shahirmarathi directormarathi moviesana shindesana shinde birthday
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Prasad Oak wishes Swapnil Joshi on his Birthday

Video : "बाबा तू इथून जा ना", स्वप्निल जोशी सेटवर येताच असं का म्हणाला प्रसाद ओक?, वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या पण…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.