छोट्या पडद्यावरील “सारेगमप लिटिल चॅम्प्स” या सिंगिंग रिऍलिटी शोमधून घराघरात पोहोचलेली लाडकी जोडी म्हणजे गायक मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे. मुग्धा व प्रथमेशने ‘आमचं ठरलं’ म्हणत चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर केली. मुग्धा व प्रथमेश यांनी त्यांच्या सुमधुर गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. या दोघांच्या युट्यूब, इन्स्टाग्राम व्हिडिओही व्हायरल होत असतात. त्यांच्या प्रत्येक व्हिडिओवर चाहते नेहमीच कौतुकास्पद कमेंट करत असतात. दोघांच्या गायनाच्या व्हिडिओवर नेहमीच चाहत्यांकडून प्रेम मिळाले आहे, मात्र अलीकडेच ही जोडी एका व्हिडिओमुळे ट्रोलींगच्या कचाट्यात अडकली. (Prathamesh Laghate Mugdha Vaishampayan Video)
काही दिवसांपूर्वी मुग्धा व प्रथमेश यांनी ‘ओ रंगरेज’ या गाण्यावर सूर धरलेला पाहायला मिळतोय. हे गाणं त्यांनी ड्राइव्हिंग करत असताना गायलं व त्याचा व्हिडीओ त्यांनी पोस्ट केला असल्याने नेटकऱ्यांनी त्यांना खडेबोल लगावले. ड्रायव्हिंग करताना गाणं गातानाचा शेअर केलेला व्हिडीओ पाहून अनेकांनी नाराजी दर्शविली. या व्हिडिओमध्ये मुग्धा ड्रायव्हिंग सीटवर बसून, तर बाजूच्या सीटवर प्रथमेश बसून दोघेही गाणं गात आहेत. हा व्हिडीओ प्रथमेशने शूट केला आहे.
ड्राइव्ह करताना गाणं गायल्याच कृत्य केल्याने प्रेक्षकांनी मुग्धा, प्रथमेशवर नाराजी व्यक्त केली आहे. गाडी चालवताना असे व्हिडिओ न बनवण्याचा सल्लाही प्रेक्षकांनी या दोघांना दिला आहे. या व्हिडिओमुळे ट्रोल झाल्यानंतर आता मुग्धा व प्रथमेशने आणखी एक व्हिडिओ गाणं गातानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे, या व्हिडिओमध्ये दोघांनीही गाडीमध्ये बसूनच गाणं गायलं आहे. मात्र यावेळी त्यांनी गाडी थांबवून व्हिडिओ शूट केला आहे.
आणखी वाचा – “निदान आज तरी…”, शशांक केतकरची रस्त्यावरील सिग्नलबाबत पोस्ट, म्हणाला…
प्रथमेश व मुग्धाने देवीस्तुती गात असतानाच एक व्हिडीओ इंस्टाग्रामवरून शेअर केला आहे. यांत त्यांनी गाडी थांबवून व्हिडिओ शूट केला असल्याने त्यांच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं आहे की, ‘गाडी थांबवून हे जास्त छान आहे’, तर आणखी एका चाहत्याने कमेंट करत म्हटलं आहे की, ‘छान, गाडी थांबवून हे गाणं केल्याबद्दल धन्यवाद’, ‘तुम्ही दोघं गाडी चालवताना व्हिडिओ शूट करू नका, ते धोकादायक असतं. ड्रायव्हिंगवर लक्ष ठेवा’. तर एका युजरने म्हटलं आहे की, ‘आता कसं गाडी एका जागी थांबवून गाणं गात आहात, पुन्हा चुक करू नका’. अशा कमेंट केल्या आहेत.