मराठी सिनेसृष्टीतील ‘चॉकलेट बॉय’ अभिनेता स्वप्निल जोशीने आजवर अनेक मालिका व चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. विविध कलाकृतींमध्ये लक्षवेधी भूमिका साकारत त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. केवळ रुपेरी पडदा नव्हे, तर ‘समांतर’ या वेबसीरिजमधून स्वप्नीलने ओटीटी विश्वात पदार्पण केले होते. ज्यात त्याच्या भूमिकेचे भरभरून कौतुक करण्यात आले होते. अभिनय क्षेत्राबरोबरच तो सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. त्याच्या अनेक फोटोज व व्हिडीओजची नेहमी चर्चा होत असते. (Prasad Oak wishes Swapnil Joshi on his Birthday)
प्रेक्षकांच्या या लाडक्या अभिनेत्याचा आज वाढदिवस. त्याच्या वाढदिवसानिमित्त कलाकार मंडळींसह चाहते त्याला शुभेच्छा देताना दिसत आहे. अशात अभिनेता प्रसाद ओकने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने “स्वप्नील, तुला वाढदिवसाच्या जिलबी सारख्या गोड गोड शुभेच्छा…!!!” असं कॅप्शन देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे.
“हाय स्वप्नील, तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. देव कायम तुझ्या पाठीशी राहो.” असं प्रसाद त्याला शुभेच्छा देताना स्वप्नील मध्येच येतो. तेव्हा प्रसाद त्याला “तू बरा आहेस ना?” असा प्रश्न करतो. आणि म्हणतो की, “तू इकडे का आला? मी तुलाच वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे.” त्यावर स्वप्नील म्हणाला, “अरे पण तू तिकडे काय शुभेच्छा देतो? मी समोर उभा आहे, मला शुभेच्छा दे ना…”. त्यावर तो म्हणाला, “समोरून, त्याने काय होत नाही! समोर माणूस आला, त्याला मिठी मारली, शुभेच्छा दिल्या, त्याने काही समाधान मिळत नाही. तर सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या पाहिजे. तू जा” असं म्हणत प्रसाद स्वप्नीलला हटके स्वरूपात वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे.
हे देखील वाचा – ड्राइव्ह करताना ट्रोल झाल्यानंतर मुग्धा-प्रथमेशचा नवा व्हिडीओ, पुन्हा गाडीत गाणं गाताना पाहून नेटकरी म्हणाले, “ड्रायव्हिंगवर लक्ष…”
त्याचा हा मजेशीर व्हिडीओ कलाकार मंडळींसह चाहत्यांना पसंत पडला असून कमेंटद्वारे अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. अभिनेत्री अमृता खानविलकरने हसण्याचे इमोजी टाकत म्हणाली, “तू जा ना भाई, हॅप्पी बर्थडे”. तर श्रुती मराठेने “हाहाहा वाढदिवसाच्या शुभेच्छा!” अशी कमेंट केली आहे.
हे देखील वाचा – “निदान आज तरी…”, शशांक केतकरची रस्त्यावरील सिग्नलबाबत पोस्ट, म्हणाला…

छोट्या पडद्यावरून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या स्वप्नीलने अनेक मराठी चित्रपट व मालिकांमध्ये काम केलेलं आहे. ज्यामध्ये ‘दुनियादारी’, प्यारवाली लव्हस्टोरी’, ‘भिकारी’, ‘वाळवी’ अश्या अनेक चित्रपटांची नावे घेता येतील. त्याचबरोबर तो ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेतही झळकला होता. सध्या तो प्रसाद ओकसह ‘जिलबी’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. त्याचबरोबर, त्याचा ‘इंद्रधनुष’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून चाहते त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी आतुरलेले आहे.