कला क्षेत्रात कलाकार म्हणून काम करताना नाव घेण्याजोगा कलाकार म्हणजे अभिनेते अशोक सराफ. विनोदाचं अचूक टायमिंग, उत्तम विनोदीशैली आणि हाडाचा कलाकार म्हणून अशोक मामांना आजही ओळखलं जात. चित्रपट, मालिका, नाटक या तिन्ही क्षेत्रात मामांनी आपलं स्थान भक्कम केलं. त्यासाठीच मामांना यंदा जीवन गौरव पुरस्कार देऊन देखील सन्मानित करण्यात आलं.(Ashok Saraf Nivedita Saraf)
अशोक मामांच्या यशाची कारकीर्द बरीच मोठी आहे. कलाकार म्हणून रंगमंचावर काम करत असताना कुणीही विनाकारण हसलेलं आणि एखाद्याची उशिरा झालेली एंट्री या दोन गोष्टी मामांना अजिबात आवडायच्या नाहीत, असाच एक किस्सा मामांनी त्यांच्या मी बहुरूपी या पुस्तकात सांगितला आहे, चला तर जाणून घेऊया नेमका काय आहे तो किस्सा.
पाहा अशोक मामा का ओरडले निवेदिता यांच्यावर (Ashok Saraf Nivedita Saraf)
याबाबत बोलताना मामांनी एक किस्सा शेअर केला आहे, मामा म्हणाले आहेत की, उशिरा एन्ट्री आणि स्टेजवर हसणं या गोष्टीला माझ्याकडे माफी नाही. लग्नानंतर एकदा निवेदिताला मी याच कारणासाठी चांगलंच झापलं आहे. ‘श्रीमंत’ हे नाटक ती करत होती. झालं असं, की निवेदिताची एक एन्ट्री दिग्दर्शक विजय केंकरेनं स्क्रिप्टमधून काढून टाकली होती. त्या दृश्याची तालीम एकदोनदाच झालेली होती. त्यामुळे एका प्रयोगात चुकून निवेदितानं ती एन्ट्री घेतली. स्टेजवर सुधीर जोशी आणि संजय मोने. हिला स्टेजवर पाहून त्यांना कळेना आता काय करावं. (Ashok Saraf Nivedita Saraf)
हे देखील वाचा – ‘मैं भी माधुरी दीक्षित बनना चाहती हूँ’, मृणाल यांनी सांगितला तो किस्सा
मग सुधीरनं स्टेजवरच हिला म्हटलं, ‘आता नाहीये तुला यायचं.’तो असं मोठ्यानं म्हणाला आणि ही फिस्सकन हसली. नेमका त्या प्रयोगाला मी गेलो होतो. इतका संतापलो होतो ना! तिला म्हटलं, स्टेजवर हसायचं असेल तर काम बंद करायचं आणि घरी बसायचं. हसू आवरता येत नसेल तर नका करू काम. कामपूर्तीची निष्ठा पाहता मामाचं बोलणं ही अगदी अचूक होत. निवेदिता यांना अशोक मामांनी तेव्हा जे झापलंय त्याची त्यांना आजही जाणीव आहे. ‘कधी येतंय असं हसू वाटलं तर, अशोकचा चेहरा मी समोर आणते आणि हसू पळून जातं,’ असं निवेदिता आजही सांगते.
