आजवर मृणाल कुलकर्णी यांनी त्यांच्या अभिनयशैलीने, दिग्दर्शनाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं आहे. शिवाय त्या एक उत्तम लेखिका देखील आहेत. त्यांना आलेले बरेच अनुभव त्यांनी त्यांच्या मेकअप उतरवल्यावर या पुस्तकातून मांडले आहेत. त्यांनी सांगितलेले काही अनुभव मात्र थक्क करणारे आहेत. असाच एक अंगावर शहारे आणणारा एक किस्सा मृणाल यांनी सांगितलाय, चला तर जाणून घेऊया काय आहे तो किस्सा आजच्या जपलं ते आपलं या भागात.(Mrunal Kulkarni Shares Incidence)
सिनेविश्वात काम करत असताना प्रत्येक नटीला वाटत असत की, मैं भी माधुरी दीक्षित बनना चाहती हूँ, या रंगीन आणि गंभीर अशा दोन्ही वाटणाऱ्या मुद्द्याला साजेसा असा मृणाल यांनी किस्सा सांगितला आहे. त्या दिवशी मी माझ्या मेकअप रूममध्ये बसले होते आणि अचानक दाराबाहेर खूप आरडाओरडा ऐकू आला. अंदाजे अठरा-एकोणीस वर्षांची मुलगी रडत रडत बोलत होती. तिच्याशी एक माणूस भांडत होता. खरं तर असं नेहमी घडत नाही. शूटिंगमध्ये सर्व व्यवहार शांतपणे चालू असतात. होता होता बाहेरचा आवाज खूप वाढला. मला राहवेना.
पाहा का म्हणाल्या मृणाल ‘मैं भी माधुरी दीक्षित बनना चाहती हूँ’, (Mrunal Kulkarni Shares Incidence)
दरवाजा उघडून मी बाहेर आले, तर समोरचा माणूस त्या मुलीला आता मारत होता. बाकी सारी गर्दी नुसत्या बघ्यांची. मला एवढा संताप आला… काहीही कारण असेल, अगदी काहीही… पण तो सगळा प्रसंगच इतका भयंकर होता की मला गप्प बसवेना. मी आवाज चढवला. चढवावाच लागला. मॅडम मध्ये पडताहेत हे लक्षात आल्यावर गर्दी पांगली. ती मुलगीही डोळे पुसत जमावात मिसळून गेली व तो माणूसही. त्यानंतर शूटिंगही चालूच राहिल.(Mrunal Kulkarni Shares Incidence)
दुपारच्या जेवणाच्या सुट्टीच्या वेळी मला परत ती मुलगी दिसली. तिच्याच वयाच्या तीन-चार जणींबरोबर तिचा हास्य-विनोद चालू होता. झाल्या प्रसंगाची खूणही तिच्या वागण्यात दिसत नव्हती. मी बुचकळ्यात पडले. काही संगतीच लागेना. माझ्या हेअर ड्रेसरला मी तिला शोधायला पाठवलं. आल्या आल्या ती मुलगी ‘सॉरी’ म्हणायला लागली.
हे देखील वाचा – ‘चाळिशीतली बंगाली महिला हवी’ म्हणून जुईला दिला नकार
इतका वेळ मी तिला प्रश्न करत होते. तिला मात्र तिच्या आयुष्याबद्दल प्रश्न नव्हतेच मुळी. तिला उत्तरं मिळाली होती. शरीराचा सौदा करणं, ही तिच्यासाठी मोठी बाब नव्हतीच, कारण ‘हे’ केल्याशिवाय पुढं काम मिळतच नाही, हेच तिला शिकवलं गेलं होतं. तिनंही ते बिनतक्रार सहजतेनं मान्य केलं होतं. (Mrunal Kulkarni Shares Incidence)
“कुछ पाने के लिए कुछ खोना तो पडता ही है ना मॅडम! भगवानने एकही जिंदगी दी है तो मज़े से गुजारनी चाहिए! हर काम के उसूल होते हैं! मैंने अगर वादा निभाया है तो उनको भी निभाना पडेगा ना? आप ही बताइए- मैं सही हूँ ना ?” ती कळवळून विचारत होती. इतका वेळ तिच्यावर प्रश्नांची फैरी झाडणारी मी अवाक झाले होते, सुन्न झाले होते.
मृणाल यांनी खरं सांगायचं तर सत्य परिस्थिती हाताळत त्यावर भाष्य केलं आहे. आजकाल सिनेसृष्टीत काम करत असताना असे अनेक मुद्दे कानावर पडत असतात, मात्र त्यात हात न घालता जो तो आपल्या कामाला लागतो.