गेले २-३ वर्ष संपूर्ण जग कोरोना महामारीशी झुंज देत आहे,कलाकारांनाही कोरोनाची झळ बसली.आणि अनेकांच्या आयुष्यात मोठी उलथापालथ झाली.असच कोरोनामुळे मोठं संकट ओढवलेला कलाकार म्हणजे अभिनेता भूषण कडू.आपल्या विनोदी शैलीने भूषणने अनेक काळ प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.(Bhushan Kadu Away From Industry)
कोरोना पूर्वी भूषण मराठी बिग बॉस च्या सीजन १ मध्ये झळकला होता.भूषण ची हळवी बाजू बिग बॉस मध्ये पाहायला मिळाली होती.स्पर्धक म्हणून ही भूषण प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.भुषणचा मुलगा आणि पत्नी जेव्हा बिग बॉस च्या घरात आले होते, तेव्हा भूषण खूप जास्त भावुक झाला होता, तेव्हाच भूषणची हळवी बाजू प्रेक्षकांच्या समोर आली.
पाहा का आहे भूषण सिनेसृष्टीपासून लांब? (Bhushan Kadu Away From Industry)
भूषणने आपल्या कामाने कायमच प्रेक्षकांचं मन जिंकलं, परंतु कोरोनाचा भूषणला मोठा फटका बसला, या काळात भूषणने त्याची पत्नी गमावली.भूषणची पत्नी कादंबरी कडू हिला मे २०२१ मध्ये कोरोनाची लागण होती. २०२१ मध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आणि तेव्हा हि परिस्थिती गंभीरच होती. कादंबरी वर त्या काळात उपचार सुरु होते, परंतु त्या प्रयत्नांना काही यश आले नाही, आणि त्या उपचारादम्यान कादंबरीचा मृत्यू झाला.पत्नीच्या अशा अचानक जाण्याने भूषण कोलमडला.(Bhushan Kadu Away From Industry)

भूषणला एक मुलगा आहे, त्याचा सध्या तो एकटाच सांभाळ करत आहे. भूषणने बिग बॉस व्यतिरिक्त भुताची शाळा,बत्ती गुल,नवरा माझा भवरा यांसारखे अनेक चित्रपट केले आहेत.त्याच सोबत कॉमेडी एक्सप्रेस,महाराष्ट्राची हास्यजत्रा या शो मधून देखील भूषणने त्याच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं, पंरतु पत्नीच्या निधनानंतर खचलेला भूषण सध्या कोणत्या ही नवीन प्रोजेक्ट मध्ये दिसला नाही.तसेच तो सोशल मीडियापासूनहि दूर असल्याच पाहायला मिळत. भूषणने दुःखातून सावरून पुन्हा कलाविश्वात परतावे हीच त्याच्या चाहत्यांची इच्छा आहे.

हे देखील वाचा : अरुण कदम यांच्या पत्नीला खटकते ‘ही’ गोष्ट