मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची आवडती झालेली लोकप्रिय जोडी म्हणजे सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर. या पिळगांवकर जोडीने आपल्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या जोडीने अनेक हिट चित्रपट देत आजवर मराठी व हिंदी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांची लाडकी लेक श्रिया पिळगांवकरदेखील या अभिनय क्षेत्रात आली आहे.
सचिन-सुप्रिया यांची लेक श्रिया पिळगावकरने बॉलीवूडमध्ये आपली एक वेगळीच ओळख निर्माण कली आहे. ‘मिर्झापूर’, ‘गिल्टी माईंड्स’, ‘द ब्रोकन न्यूज’ अशा वेबसीरिजमध्ये दमदार भूमिका साकारत श्रियाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अशातच नुकताच २५ एप्रिल रोजी तिचा ३५वा वाढदिवस झाला. या खास दिवशी श्रियाला मराठीसह हिंदी सिनेविश्वातील अनेक कलाकार मंडळींनी व अनेक चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या होत्या.
आणखी वाचा – AJ-लीलाच्या मेहंदी सोहळ्यात ‘अप्सरा’ची हवा, सोनाली कुलकर्णीचा खास परफॉर्मन्स, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
अशातच श्रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे तिच्या वाढदिवसाच्या खास सेलिब्रेशनचा व्हिडीओ शेअर केला आहे. श्रियाच्या वाढदिवसाला मराठीसह अनेक बॉलिवूड कलाकारांनीही हजेरी लावली होती. यावेळी श्रिया केक कापल्यानंतर आईवडिलांच्या पाया पडली. तिच्या या पाया पडण्याच्या कृतीमुळे सोशल मीडियाव तिचे कौतुक केले होत आहे. यानंतर तिने आई-वडिलांबरोबर डान्सही केला. तसेच सचिन व सुप्रिया यांनीही एकमेकांबरोबर रोमॅंटिक डान्स केला.
आणखी वाचा – गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये काम करणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री आता दिसते अशी, अभिनयक्षेत्रामधूनही गायब अन्…
हा व्हिडीओ शेअर करत तिने असं म्हटलं आहे की, “हा माझा एक उत्तम वाढदिवस होता. मला आवडत असलेल्यांबरोबर मी मनापासून नृत्य केले आणि माझ्या पालकांनीही साहजिकच त्यांच्या डान्सने अक्षरश: आग लावली. तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रेम व शुभेच्छांबद्दल धन्यवाद.” दरम्यान, या व्हिडीओखाली श्रियाला तिच्या अनेक चाहत्यांनी व अनेक कलाकारांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.