टेलिव्हिजन क्षेत्रातील कॉमेडी क्वीन भारती सिंह ही नेहमी चर्चेत असते. ती नेहमी आपल्या सोशल मीडिया आकाऊंटवरुन आपल्या आयुष्यातील अनेक प्रसंग चाहत्यांबरोबर शेअर करत असते. अशातच तिने आता मनोरंजन क्षेत्रांमध्ये कलाकारांना होणाऱ्या त्रासाबद्दल भाष्य केल्याने पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सेटवर काम करताना कलकारांना कोणत्या समस्या येतात तसेच ते कोणत्या परिस्थितिमध्ये काम करतात याबद्दल तिने खुलासा केला आहे. त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. (bharti singh on daily soap struggle)
भारती व तिचा पती हर्ष लिंबाचिया हे दोघेही टेलिव्हिजन क्षेत्रातील प्रसिद्ध कलाकार आहेत. त्यांनी स्वतःचा पॉडकास्टही सुरु केला आहे. या पॉडकास्टमध्ये त्यांनी अभिनेत्री प्राची देसाई व अभिनेता मनोज वाजपेयी यांना आमंत्रित केले होते. यादरम्यान मनोज व प्राची यांनी टेलिव्हिजन शो सेटवर दीर्घ काळ काम करण्याबाबत दोघांनीही खुलासा केला. त्यानंतर भारतीने त्यावर आपले मत मांडले आहे. तिने सेटवरील महिला कलाकार हाताला सलाईन लागली असतानादेखील कशाप्रकारे शूट करतात त्याबद्दल सांगितले आहे. ती म्हणाली की, “मी मुलींना डेली सोपवर सलाईन लावून काम करताना पाहिले आहे. त्यांना घरी जाण्याची परवानगी नसे”.
त्यानंतर हर्षनेदेखील खुलासा करत सांगितले की, “दिग्दर्शकांना त्यांच्या शॉटव्यतिरिक्त कशाशीही देणं-घेणं नसतं. कलाकार किती वाईट परिस्थितिमधून जात आहे याबद्दल त्यांना कोणतीही फिकीर नसते”. तसेच तो पुढे म्हणाला की, “कलाकार खूप कमी तासांची झोप घेऊन सेटवर 15 तास काम करतात. कमी झोप मिळाल्यामुळे त्यांना आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागतो. लोक चहा पितात, सिगरेट ओढतात, कमी जेवतात, पित्त होते पण यावर ते नियंत्रण ठेऊ शकत नाहीत”. त्यावर प्राचीनेदेखील सांगितले की, “मी जेव्हा टीव्हीवर काम करायचे तेव्हा झोप घालवण्यासाठी रात्रंदिवस कॉफी प्यायचे”.
सध्या प्राची व मनोज त्यांचा आगामी चित्रपट ‘सायलेन्स 2- कॅन यु हियर इट’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. हा चित्रपटामध्ये साहिल वैद्य, वकार शेख, दिनकर शर्मा व पारुल गुलाटीदेखील मुख्य भूमिकांमध्ये दिसणार आहेत.