शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : टी-शर्ट खेचलं, धमकी दिली अन्…; ‘बिग बॉस १७’च्या घरात स्पर्धकांमध्ये जोरदार भांडण, वाद विकोपाला, व्हिडीओ व्हायरल

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 30, 2023 | 12:58 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Arun mashetty tehelka got physical fight with Abhishek kumar

Arun mashetty tehelka got physical fight with Abhishek kumar

‘बिग बॉस १७’चं हे पर्व सध्या प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन करताना दिसत आहे. सुरुवातीपासून या पर्वात बरीच भांडणं, मारामारी आणि वादावाद पाहायला मिळाले. त्यामुळे प्रेक्षक पहिल्यापासून या कार्यक्रमाला जोडले गेले आहेत. नुकताच या शोचा नवीन प्रोमो समोर आला आहे. जो पाहता हा या शोमध्ये एक वेगळंच वळण आलं आहे. युट्युबर स्टार अरुण माशेट्टी व तहलका यांच्यावर एलिमेशनची टांगती तलवार असल्याचं समोर येत आहे. नुकत्याच आलेल्या प्रोमोत शोमध्ये या दोघांनी अभिषेक कुमारबरोबर गैरवर्तन केलं तर दुसरीकडे हा वाद मारामारीपर्यंत गेलेला पाहायला मिळाला. (Arun mashetty tehelka got physical fight with Abhishek kumar)

प्रोमोत याची सुरुवात ईशा मालवीय अलार्म वाजल्यानंतरही झोपून राहिली असल्यापासून होते. त्यामुळे अरुण माशेट्टी तिला चांगलंच फटकारताना दिसतो आणि नंतर तो ईशाला न झोपण्याची ताकीद देतो. पण दुसरीकडे ईशा त्याच्या त्या गोष्टीकडे दुर्लक्षीत केल्या सारखं करते. ती पुढे सगळ्यांसह अरुणला उद्देशून सांगते की, सगळेच झोपतात. हे ऐकताच अरुण ओरडायला सुरुवात करतो आणि  पुढे सांगतो की, “मी सकाळचा अलार्म वाजल्यानंतर कधीच झोपून राहत नाही”.

Promo : Tehelka got into physical fight with #AbhishekKumar !!#BiggBoss17 #Tehelka #IshaMalviyapic.twitter.com/b2UqsV7Rba

— #BiggBoss17_Tak (@BiggBoss17_Tak) November 29, 2023

आणखी वाचा – “माझं सगळं आयुष्य…”, गर्लफ्रेंडची प्रथमेश परबसाठी पोस्ट, वाढदिवसही केला जोरदार सेलिब्रेट, म्हणाली, “तुझ्यासाठी…”

ईशा व अरुण यांच्या वादात अभिषेक कुमारही मधे पडतो. अभिषेक अरुणला ईशाबरोबर शांततेत बोलायला सांगतो. या गोष्टीवरही अरुण आणखी भडकतो आणि अभिषेकला या सगळ्या विषयापासून लांब राहायला सांगतो. अरुण अभिषेकची वादावादी होताना पाहून अरुणचा मित्र सनी तहलकदेखील वादात मध्ये पडतो. पुढे तो अभिषेकचं टी-शर्ट पकडून फाडण्याचाही प्रयत्न करतो.

आणखी वाचा – ‘ॲनिमल’ चित्रपटानंतर रणबीर कपूरला अभिनय क्षेत्रातून घेणार ब्रेक?, स्वतःच खुलासा करत म्हणाला, “मला आता केवळ…”

या मारामारीदरम्यान अरुणने अभिषेकची मानेलाही पकडताना दिसतो. तसेच तो त्याला उशीने मारण्याची धमकी देतो. यासगळ्यात घरातील इतर सदस्य अभिषेक कुमारला पाठिंबा देताना दिसतात. ते अरुण व सनीला थांबवण्याचा प्रयत्न करतात. या आधीही ‘बिग बॉस’ने सनीला त्याच्या वागण्यावरून बऱ्याचदा ताकिद दिली होती. पण त्यानंतरही त्याच्या वागण्यात कोणत्याही सुधारणा झाल्या नाहीत. त्यामुळे आता ‘बिग बॉस’ सनी तहलका व अरुण माशेट्टी या दोघांना घरातून बाहेर काढणार की त्यांना आणखी एक संधी देणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.

Tags: Abhishek kumararun mashettybigg boss 17tehelka
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
marathi actress aishwarya narkar shared video with her childhood photos and aid thanks to her parents

लहान असताना अशा दिसायच्या ऐश्वर्या नारकर, एका गोष्टीसाठी आई-वडिलांचेही मानले आभार, म्हणाल्या, "त्यांनी माझे…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.