‘बिग बॉस १७’चं हे पर्व सध्या प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन करताना दिसत आहे. सुरुवातीपासून या पर्वात बरीच भांडणं, मारामारी आणि वादावाद पाहायला मिळाले. त्यामुळे प्रेक्षक पहिल्यापासून या कार्यक्रमाला जोडले गेले आहेत. नुकताच या शोचा नवीन प्रोमो समोर आला आहे. जो पाहता हा या शोमध्ये एक वेगळंच वळण आलं आहे. युट्युबर स्टार अरुण माशेट्टी व तहलका यांच्यावर एलिमेशनची टांगती तलवार असल्याचं समोर येत आहे. नुकत्याच आलेल्या प्रोमोत शोमध्ये या दोघांनी अभिषेक कुमारबरोबर गैरवर्तन केलं तर दुसरीकडे हा वाद मारामारीपर्यंत गेलेला पाहायला मिळाला. (Arun mashetty tehelka got physical fight with Abhishek kumar)
प्रोमोत याची सुरुवात ईशा मालवीय अलार्म वाजल्यानंतरही झोपून राहिली असल्यापासून होते. त्यामुळे अरुण माशेट्टी तिला चांगलंच फटकारताना दिसतो आणि नंतर तो ईशाला न झोपण्याची ताकीद देतो. पण दुसरीकडे ईशा त्याच्या त्या गोष्टीकडे दुर्लक्षीत केल्या सारखं करते. ती पुढे सगळ्यांसह अरुणला उद्देशून सांगते की, सगळेच झोपतात. हे ऐकताच अरुण ओरडायला सुरुवात करतो आणि पुढे सांगतो की, “मी सकाळचा अलार्म वाजल्यानंतर कधीच झोपून राहत नाही”.
Promo : Tehelka got into physical fight with #AbhishekKumar !!#BiggBoss17 #Tehelka #IshaMalviyapic.twitter.com/b2UqsV7Rba
— #BiggBoss17_Tak (@BiggBoss17_Tak) November 29, 2023
ईशा व अरुण यांच्या वादात अभिषेक कुमारही मधे पडतो. अभिषेक अरुणला ईशाबरोबर शांततेत बोलायला सांगतो. या गोष्टीवरही अरुण आणखी भडकतो आणि अभिषेकला या सगळ्या विषयापासून लांब राहायला सांगतो. अरुण अभिषेकची वादावादी होताना पाहून अरुणचा मित्र सनी तहलकदेखील वादात मध्ये पडतो. पुढे तो अभिषेकचं टी-शर्ट पकडून फाडण्याचाही प्रयत्न करतो.
या मारामारीदरम्यान अरुणने अभिषेकची मानेलाही पकडताना दिसतो. तसेच तो त्याला उशीने मारण्याची धमकी देतो. यासगळ्यात घरातील इतर सदस्य अभिषेक कुमारला पाठिंबा देताना दिसतात. ते अरुण व सनीला थांबवण्याचा प्रयत्न करतात. या आधीही ‘बिग बॉस’ने सनीला त्याच्या वागण्यावरून बऱ्याचदा ताकिद दिली होती. पण त्यानंतरही त्याच्या वागण्यात कोणत्याही सुधारणा झाल्या नाहीत. त्यामुळे आता ‘बिग बॉस’ सनी तहलका व अरुण माशेट्टी या दोघांना घरातून बाहेर काढणार की त्यांना आणखी एक संधी देणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.