सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘ॲनिमल’ चित्रपटानंतर रणबीर कपूरला अभिनय क्षेत्रातून घेणार ब्रेक?, स्वतःच खुलासा करत म्हणाला, “मला आता केवळ…”

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 28, 2023 | 11:51 am
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
ranbir Kapoor wants to quit acting

ranbir Kapoor wants to quit acting

बॉलिवूडमध्ये सध्या अभिनेता रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाबाबत बरीच उत्सुकता पाहायला मिळत आहे. हा बहुचर्चित चित्रपट १ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या चित्रपटातील सगळे कलाकार चित्रपटाच्या प्रमोशनामध्ये व्यस्त असलेले पाहायला मिळत आहेत. विविध शहरांमध्ये जावून हे कलाकार चित्रपटाचं प्रमोशन करत आहेत. यादरम्यान हैदराबादमधील प्रमोशनावेळी रणबीरने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबरोबर त्याच्या व्यावसायिक आयुष्याचाही खुलासा केला. यासह त्याने हेही स्पष्ट केलं की त्याला त्याचा बराचसा वेळ त्याच्या लेकीसह घालवायचा आहे आणि त्याला अभिनय करण्याची इच्छा नाही. (ranbir Kapoor wants to quit acting)

नुकताच रणबीर त्याच्या ‘ॲनिमल’ चित्रपटाच्या प्रमोशनासाठी चेन्नईत पोहोचला. यावेळी त्याच्याबरोबर अभिनेता बॉबी देओल व अभिनेत्री रश्मिका मंदानाही उपस्थित होती. तेव्हा हैदराबादमधील प्रमोशन कार्यक्रमादरम्यान लेकीबाबत बोलताना त्याने स्पष्ट केलं की, “मला आता केवळ माझ्या लेकीबरोबर वेळ घालवायचा आहे. मला आता अभिनय करायचा नाही. मला काम पूर्णपणे बंद करायचं आहे. पण मी असं करू शकत नाही. कारण मला माझी आवडही जोपासायची आहे. हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद आहे. देव जेव्हा काही हिरावून घेतो तेव्हा तो तुम्हालाही काहीतरी देतो. राहा आमच्या आयुष्यात आली याबद्दल मी देवाचा खूप आभारी आहे”, असं सांगत त्याने आपल्या लेकीबाबतच प्रेम व्यक्त केलं. त्याचबरोबर त्याने त्याची कामाबाबतची आवडही सांगितली.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आणखी वाचा – Kantara 2 Teaser : हातात भाला, रुद्रावतार अन्…; ‘कांतारा २’चा अंगावर काटा आणणारा टीझर प्रदर्शित, काही मिनिटांमध्येच लाखो व्ह्युज

रणबीर कपूर व आलिया भट्ट हे जोडपं मागच्या वर्षी ६ नोव्हेंबरला आई-बाबा झाले. नुकताच त्यांनी त्यांच्या लेकीचा पहिला वाढदिवस साजरा केला. लेक वर्षाची झाली असली तरीही मात्र त्यांनी अजूनपर्यंत त्यांच्या लेकीचा चेहरा दाखवलेला नाही. जेव्हा राहाचा जन्म झाला होता त्यावेळी तो ‘ॲनिमल’ चित्रपटाची शुटिंग करत होता.

View this post on Instagram

A post shared by Alia Bhatt ???? (@aliaabhatt)

आणखी वाचा – कतरिना कैफ, रश्मिका मंदानानंतर आलिया भट्टचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल, अश्लील हातवारे करतानाचं दृश्य समोर

हा चित्रपट १ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात रणबीरसह अभिनेता बॉबी देओल, अभिनेत्री रश्मिका मंदाना तसेच अनिल कपूरही दिसणार आहे. हा चित्रपट संदीप रेड्डी वंगा यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकिंग सुरु झालं आहे. माहितीनुसार २ लाखांहून अधिक तिकिटं विकली गेल्याचं समोर आलं आहे.

Tags: animal moviebollywood actorranbir kapoor
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Rohit Bal Admitted To ICU

फॅशन डिझायनर रोहित बल यांची प्रकृती गंभीर, रुग्णालयात मृत्यशी देत आहे झुंज कारण…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.