अलका कुबल यांचा ‘माहेरची साडी’ चित्रपट अजरामर झाला असं म्हणणं वावगं ठरणार नाही. आजही या चित्रपटाचा उल्लेख आवर्जुन केला जातो. अलका यांना आजही याच चित्रपटामुळे ओळखलं जातं. ‘माहेरची साडी’ म्हटलं की, अलका यांचा चेहरा डोळ्यासमोर उभा राहतोच. मात्र या चित्रपटानंतर त्यांच्यावर बरीच टीकाही झाली. रडूबाईच्याच भूमिका अलका करतात असंही बोललं जात होतं. अजूनही त्यांच्यावर मीम्स बनतात. मात्र या सगळ्याकडे दुर्लक्ष करत आहे ते काम, भूमिका चोख करायच्या हे अलका यांनी मनाशी ठाम केलं होतं. इतकंच काय तर चित्रपटांमध्ये तिरडीवर झोपणंही त्या एन्जॉय करत होता. याचविषयी अलका यांनी आता भाष्य केलं आहे. (alka kubal talk about industry)
ITSMAJJA च्या ठाकुर विचारणार कार्यक्रमात अलका यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. २००७मध्ये अपघात झाल्यानंतर अलका यांना इंडस्ट्रीकडून काही वाईट अनुभव आले. निर्मात्यांनी साइन केलेल्या प्रोजेक्टचे पैसेही त्यांच्याकडून परत मागितले. या संपूर्ण काळाचा उल्लेख केल्यानंतर अलका म्हणाल्या, “इंडस्ट्री तशीच असते असं मला वाटतं. चांगलं असेल त्याच्या मागे इंडस्ट्री असते. मी टिपिकल भूमिका करत होते म्हणून माझ्यावर खूप टीका झाली. रडूबाईच्याही भूमिका मी करत होते. माझ्या रडण्यावर अजूनही मीम्स येतात”.
आणखी वाचा – अलका कुबल यांचा जावयही आहे पायलट, विमान अपघातात त्याचा मित्र गेला अन्…; सांगितला ‘तो’ प्रसंग
“पण मी ते चांगल्या पद्धतीनेच घेते. कुठेतरी माझं नाव आहे म्हणून ते वापरलं जातं. माझं नावच नसतं तर मीम्समध्ये तरी कशाला आलं असतं?. आताची लहान मुलं मला ओळखतात ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. नायिका होऊन मला ४० वर्ष झाली. वयाच्या १७व्या वर्षी मी नायिका झाले. यावर्षी मी आता ६०ठीला आले आहे. मी व्यवसाय म्हणून सगळं पत्करलं. जेव्हा मला कंटाळा येईल तेव्हा मी भूमिकांना नाही म्हणेन असं मी ठरवलं होतं. ज्या भूमिका स्वीकारल्या त्या चोखपणे पार पाडायच्या हे मी ठरवलेलं”.
आणखी वाचा – “म्हातारपणात वेड लागलं, सूनेचंही कौतुक करा”, म्हणणाऱ्यांना बिग बींनी फटकारलं, म्हणाले, “गांजा फुकून…”
“मला रडण्यासाठी घेतलं आहे ना मग मी माझ्या प्रेक्षकांना हमखास रडवणार. एवढी मी व्यावसायिक होते. निर्मात्यांची, दिग्दर्शकांची मागणी होती की, अलका पाहिजे, अलकाचा छळ झाला पाहिजे, अलका मेली पाहिजे. मी सगळं आनंदाने करायचे. शेवटी शेवटी तिरडीवर झोपणंही मी एन्जॉय करत होते. अशा खूप गंमती होत्या”. अलका यांनी योग्य पद्धतीने त्यांचं मत मांडलं. खरं तर हाती आलेलं प्रत्येक काम त्यांनी प्रेमाने, निष्ठेने आणि मेहनतीने केलं.





