शुक्रवार, जून 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आम्हाला मरायची इच्छा नाही”, मढ-आयलँडमधील रस्त्याबाबत भडकला शशांक केतकर, म्हणाला, “निष्काळजीपणा आणि…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 24, 2025 | 6:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
shashank ketkar shared angry video

"आम्हाला मरायची इच्छा नाही", मढ-आयलँडमधील रस्त्याबाबत भडकला शशांक केतकर, म्हणाला, "निष्काळजीपणा आणि…"

shashank ketkar shared angry video : नेहमीच सामाजिक, राजकीय मुद्द्यांवर सडेतोडपणे भाष्य करणाऱ्यांच्या यादीत अभिनेता शशांक केतकर याचे नाव आवर्जून घेतले जाते. बरेचदा त्याने ट्रॅफिक, वाहतुकीचे नियम, रस्त्यावरील खड्डे, कचरा यांसारख्या अनेक सामाजिक मुद्द्यांवर आवाज उठवला आहे. त्याच्या या पोस्ट बऱ्याच वेळी चर्चेत असतात. सोशल मीडियावर शशांक बऱ्यापैकी सक्रिय असतो, नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. विशेषतः एखाद्या मुद्द्यावर शशांकने आवाज उठविल्यानंतर त्याची त्याची अंमलबजावणी सुद्धा झालेली पाहायला मिळाली आहे. सध्या शशांक ‘मुरंबा’ या मालिकेचं चित्रीकरण करत आहे. हे चित्रीकरण सध्या मढ आयलँड येथे आहे. त्यामुळे मढ आयलँड येथील रस्त्यावरचा एक व्हिडीओ शेअर करत शशांकने आवाज उठविला आहे.

शशांकने व्हिडीओमध्ये असं म्हटलं आहे की, “पावसाळ्याचे दिवस चालू आहेत. रस्त्यावरील लाइट्स बंद असतात. धो-धो पाऊस पडत असेल आणि आम्हाला रस्त्याच्या मध्यभागी असलेली झाडं दिसलीच नाही तर…. मला माहित आहे मी असा आवाज उठवला की अनेकांना ते हास्यास्पद वाटतं पण प्रत्येकाच्या मनात ते कुठेतरी पटतं असतं. अशी परिस्थिती आपल्या मुंबई, महाराष्ट्र आणि भारतात अगदी प्रत्येक रस्त्यात दिसते. विकास खूप होतो मान्य आहे पण हा भ्रष्टाचार नाही तर निष्काळजीपणा आहे. मढ आयलंडचा हा रस्ता अनेक वर्षांनी करण्यात आला. हा रस्ता करताना काही झाडे तोडली तर मग ही दोन झाडे का ठेवली हे कोडं मला सुटलेलं नाही”.

आणखी वाचा – त्वचेचा कॅन्सर झालेल्या आजीला नातवाने कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं अन्…; मुंबईतील धक्कादायक घटना

View this post on Instagram

A post shared by Shashank Ketkar (@shashankketkar)

पुढे त्याने म्हटलं आहे की, “जपानी पद्धतीने झाडे मुळापासून तोडून ती पुन्हा नवीन ठिकाणी लावणं ही अपेक्षाच नाही आणि झाडे तोडून तुम्ही रस्ता किंवा विकास करा या मताचा मी नाही. पण आता तुम्ही हा रस्ता केलाच आहात मग ही दोन झाडे का ठेवली आहेत? म्हणजे ही झाडे रस्त्याची शोभा वाढवत आहेत की दुभाजक आहेत हे मला कळलेलं नाही. जमलं तर या दोन्ही झाडांच्या दोन बाजूंना रिफ्लेक्टर लावा. ते ऑनलाईन मिळतं. हवं तर त्याची लिंक मी देतो. त्यांचा बजेट अजून निघालं नसेल किंवा त्यांचं कंत्राट अजून कोणाला दिलेलं नसेल तर ते कंत्राट मला द्या. शशांक केतकर यांच्याकडून दोन रिफ्लेक्टर तरी त्या झाडाला लावा. म्हणजे आमच्या गाड्यांचे लाईट्स त्यावर पडतील आणि त्या रिफ्लेक्टर मुळे आम्हाला ती झाडं दिसतील”.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध कोरियोग्राफरचा सिनेविश्वाला रामराम, टोकाचं पाऊल उचलण्यामागचं कारणही सांगितलं…

शेवटी त्याने म्हटलं, “आम्हाला मरायची इच्छा नाही. तुम्हाला आमची काळजी नसेल तरी आम्हाला आमची काळजी आहे. त्यामुळे दोन रिफ्लेक्टर मागवा आणि ते या झाडाला लावा किंवा या झाडांच काहीतरी करा. कारण ही झाडे रस्त्याच्या मध्येही नाहीत किंवा बाजूलाही नाहीत. त्यात या झाडांना रिफ्लेक्टर सुद्धा नाही. या व्हिडीओसह कॅप्शन देत शशांकने म्हटलं आहे की, “देशात विकास होत आहे याचा खरंच आनंद आणि अभिमान आहे. पण या आणि अशा दुर्लक्षित छोट्या छोट्या लाखो गोष्टी आहेत हे फक्त एक उदाहरण आहे. पाऊस खूप असेल वा नसेल. समोरचं नीट दिसेल वा नसेल. आम्ही सामान्य माणसाने स्वतःचा जीव कसा वाचवायचा ? हा भ्रष्टाचार सुद्धा नाही… हा फक्त कंटाळा आहे. निष्काळजीपणा आणि चलता है ही वृत्ती आहे. महानगरपालिका आणि स्थानिक आमदाराला हा व्हिडीओ टॅग करत त्याने, “ज्यांची responsibility आहे त्यांच्या पर्यंत निरोप तुम्ही पोहोचवाल आणि काम होईल याची खात्री आहे, कारण या शहरातल्या प्रत्येकाची तुम्हाला काळजी आहे याचीही मला खात्री आहे”.

Tags: marathi actorshashank ketkar
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 taarak mehta ka ooltah chashmah bagha
Entertainment

सीनदरम्यानच ढसाढसा रडू लागला बाघा, आईच्या आठवणीत पाणावले डोळे, निर्मात्यांनी सांभाळलं

जून 19, 2026 | 9:48 am
suhasini mulay Wedding
Entertainment

वयाच्या ६०व्या वर्षी लग्न, फेसबुकवर झालं प्रेम आणि…; ‘लगान’ फेम अभिनेत्रीची प्रेमकहाणी, पती आहेत…

जून 18, 2026 | 3:54 pm
Tula Pahata Movie
Entertainment

‘तुला पाहता’ चित्रपटाच्या निमित्ताने नचिकेत लेलेची नवी इनिंग, पार्श्वगायक म्हणूनही जबाबदारी सांभाळणार

जून 18, 2026 | 2:00 pm
Actresses Opens Up On Casting Couch
Entertainment

केबिनमध्ये बंद केलं, नायकाबरोबर रात्र…; बॉलिवूड अभिनेत्रींकडून कामाच्या बदल्यात केलेल्या घाणेरड्या मागण्या, मोठा खुलासा

जून 18, 2026 | 12:30 pm
Next Post
sana khan mother passes away

'बिग बॉस' फेम सना खानच्या आईचं निधन, पोस्ट शेअर करत दिली माहिती, म्हणाली, “तिने आजाराशी…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.