शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कपड्यावरुन झालेल्या टीकांनंतर आयरा खानची प्रतिक्रिया, नवऱ्याचा फोटो शेअर करत म्हणाली, “तुमच्या ट्रोलिंगमुळे तो आता…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 30, 2024 | 10:12 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
After being trolled on her wedding day, Ira Khan reacted by sharing a photo of husband Nupur Shikhare

कपड्यावरुन झालेल्या टीकांनंतर आयरा खानची प्रतिक्रिया, नवऱ्याचा फोटो शेअर करत म्हणाली, “तुमच्या ट्रोलिंगमुळे तो आता...”

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लेक आयरा खान ही विवाहबंधनात अडकली. बॉयफ्रेंड नूपुर शिखरेबरोबर तिने आपली विवाहगांठ बांधली. ३ जानेवारी २०२४ या तारखेला दोघांनी एकमेकांशी लग्न केले. मुंबईत नोंदणी पद्धतीने लग्न पर पडल्यानंतर उदयपूरमध्ये दोघांनी ख्रिश्चन पद्धतीने लग्नगाठ बांधली. मुंबईत पार पडलेल्या आयरा-नुपूरच्या अनोख्या लग्नाची लग्नाची खूपच चर्चा झाली होती. मुंबईतील या लग्नात नवरदेव नुपूर शिखरे हा घरातून धावत धावत लग्नस्थळी पोहोचला होता.

नूपुर त्याच्या लग्नात शॉर्ट पॅंट व बनियनवर धावत धावत लग्नस्थळी पोहोचला होता. त्यानंतर तो लग्नातदेखील त्याच कपड्यांमध्ये होता. त्याच्या या लुकमुळे सोशल मीडियावर त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. यावर आयराने आता तिची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आयराने नुपूरचा एक फोटो शेअर करत त्याच्यावर झालेल्या ट्रोलिंगबद्दल भाष्य केलं आहे.

आणखी वाचा – रोहित मानेने बायकोसह केला नव्या घरात प्रवेश, अभिनेत्याच्या पत्नीने शेअर केला नव्या घरातील पहिला फोटो, म्हणाली, “स्वप्न एकत्र पाहिलं अन्…”

आयराने नुपूरचा स्विमिंग पुलाजवळील एक फोटो इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर केला आहे. ज्यात तो निळी जीन्स, लेदरचं काळं जॅकेट आणि टोपी घालून बसलेला दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने असं म्हटलं आहे की, “तुम्ही लोकांनी याला इतकं जास्त ट्रोल केलं आहे की, तो आता पूलाजवळही जीन्स व जॅकेट घालून बसला आहे”.

आणखी वाचा – “माफी मागावी अन्यथा आंदोलन अटळ!”, जात विचारण्यावरुन पुष्कर जोगने केलेल्या पोस्टवर BMC चे अधिकारी संतापले, म्हणाले…

दरम्यान, आयरा व नुपूर सध्या हनीमूनसाठी बाली इथं गेले आहेत. तिथून ते त्यांचे काही खास फोटो शेअर करत आहेत. आयराने लग्नातील अनेक फोटो तिच्या स्टोरीवर शेअर केले होते. अशातच तिने पती नुपूर शिखरेचा एक फोटो शेअर करत लग्नाच्या दिवशी त्याच्या कपड्यांवरून झालेल्या ट्रोलिंगला तिच्या खास अंदाजात उत्तर दिलं आहे.

Tags: Bollywood entertainmentBollywood entertainment newsbollywood newsentertainment newsira khannupur shikhareआयरा खाननूपुर शिखरेबॉलिवूड बातमीबॉलिवूड मनोरंजनमनोरंजन बातमी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Mannara Chopra On Ankita Lokhande

Bigg Boss 17 : " संपूर्ण खेळ एकट्याने खेळले…", घराबाहेर पडताच मन्नारा चोप्राचा अंकिता लोखंडेला टोमणा, म्हणाली, "ती विकीबरोबर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.