नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लेक आयरा खान ही विवाहबंधनात अडकली. बॉयफ्रेंड नूपुर शिखरेबरोबर तिने आपली विवाहगांठ बांधली. ३ जानेवारी २०२४ या तारखेला दोघांनी एकमेकांशी लग्न केले. मुंबईत नोंदणी पद्धतीने लग्न पर पडल्यानंतर उदयपूरमध्ये दोघांनी ख्रिश्चन पद्धतीने लग्नगाठ बांधली. मुंबईत पार पडलेल्या आयरा-नुपूरच्या अनोख्या लग्नाची लग्नाची खूपच चर्चा झाली होती. मुंबईतील या लग्नात नवरदेव नुपूर शिखरे हा घरातून धावत धावत लग्नस्थळी पोहोचला होता.
नूपुर त्याच्या लग्नात शॉर्ट पॅंट व बनियनवर धावत धावत लग्नस्थळी पोहोचला होता. त्यानंतर तो लग्नातदेखील त्याच कपड्यांमध्ये होता. त्याच्या या लुकमुळे सोशल मीडियावर त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. यावर आयराने आता तिची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आयराने नुपूरचा एक फोटो शेअर करत त्याच्यावर झालेल्या ट्रोलिंगबद्दल भाष्य केलं आहे.
आयराने नुपूरचा स्विमिंग पुलाजवळील एक फोटो इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर केला आहे. ज्यात तो निळी जीन्स, लेदरचं काळं जॅकेट आणि टोपी घालून बसलेला दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने असं म्हटलं आहे की, “तुम्ही लोकांनी याला इतकं जास्त ट्रोल केलं आहे की, तो आता पूलाजवळही जीन्स व जॅकेट घालून बसला आहे”.
दरम्यान, आयरा व नुपूर सध्या हनीमूनसाठी बाली इथं गेले आहेत. तिथून ते त्यांचे काही खास फोटो शेअर करत आहेत. आयराने लग्नातील अनेक फोटो तिच्या स्टोरीवर शेअर केले होते. अशातच तिने पती नुपूर शिखरेचा एक फोटो शेअर करत लग्नाच्या दिवशी त्याच्या कपड्यांवरून झालेल्या ट्रोलिंगला तिच्या खास अंदाजात उत्तर दिलं आहे.