प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीने ‘बिग बॉस १७’ चे विजेतेपद पटकावले आहे. सर्व स्पर्धकांना पराभूत करुन मुनव्वरने ‘बिग बॉस १७’ च्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. ‘बिग बॉस १७’ च्या महा अंतिम सोहळ्याची चांगलीच चर्चा रंगली. या ग्रँड फिनालेचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले. अशातच या या पर्वाच्या तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या मन्नारा चोप्राचा एक व्हिडीओही समोर आला आहे. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये ती अंकिता लोखंडेबद्दल अनेक गोष्टी बोलताना दिसत आहे. (Mannara Chopra On Ankita Lokhande)
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मन्नारा म्हणाली, “अंकिताजी खूप चांगली खेळली. ती ‘बिग बॉस’चीही चाहती आहे. खेळ कसा खेळायचा हे तिला माहीत होते. मात्र ती पती विकी जैनबरोबर आली होती आणि मी घरी एकटीच होते. मी संपूर्ण खेळ एकट्याने खेळले” असं ती म्हणाली.
मन्नारा पुढे म्हणाली, “हे तीन महिने माझ्यासाठी खूप मजेशीर होते. मी घरी खूप मजा केली. माझ्यासाठी हा काळ सुट्टीसारखा होता. होय, मी तिला पराभूत केले आहे पण माझ्या मनात तिच्यासाठी खूप प्रेम आहे” असंही ती म्हणाली. ‘बिग बॉस’च्या घरामध्ये मन्नारा व अंकिता यांच्यात अनेकदा जोरदार वाद झालेले पाहायला मिळाले.
याशिवाय त्यांनी मन्नाराने जनतेचे मनापासून आभार मानले. हात जोडून ती तिच्या चाहत्यांना म्हणाली, “मला टॉप ३ मध्ये आणल्याबद्दल आणि मुलींमध्ये मला पहिल्या क्रमांकावर ठेवल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रेमाशिवाय मी इथपर्यंत पोहोचू शकले नसते”. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडणारा पहिला स्पर्धक अरुण माशेट्टी होता. तर यानंतर अंकिता लोखंडे व नंतर मन्नारा चोप्रा बाद झाल्या.