सप्टेंबर महिना उजाडला, की आपसूकच चाहुल लागते ती गणेशोत्सवाची. यंदाच्या गणेशोत्सवाला अवघा एकच दिवस उरला आहे. त्यानिमित्ताने गणेशोत्सवाची जोरदार तयारी सध्या सर्वत्र सुरु आहे. राज्यासह जगभरातही हा सण जल्लोषात साजरा केला जात असून सर्वच जण बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असतात. बाप्पा हा सर्वांच्या आवडत्या देवतांपैकी एक असल्याने सर्वच जण दरवर्षी बाप्पाची मूर्ती आणण्यापासून ते मखर सजावट करेपर्यंत, आरती पाठ कारण्यापासून ते आवडीचे नैवैद्य बनवण्यापासूनच्या तयारीत जुंपले असतात.
मोदक हा बाप्पाचा आवडीचा नैवैद्य असतो. आणि दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान प्रत्येकाच्या घरी मोदक हमखास बनवले जातात. भले ते उकडीचे असो, किंवा नारळाचे मोदक. कलर्स मराठी वाहिनीवरील ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेच्या सेटवरही गणेशोत्सवाची तयारी सुरु असून मालिकेतील रत्नमाला म्हणजेच अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी गणेशोत्सवानिमित्त मोदक बनवत आहे. (Nivedita Saraf makes Modak for Ganeshotsav)
हे देखील वाचा – “आधी चाळीत राहायचे तेव्हा…”, गणेशोत्सवाबाबत बोलताना शिवाली परबला आठवलं चाळीतलं घर, म्हणाली, “रात्रीचं मंडपात थांबणं आणि…”
सोशल मीडियावर हा व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. ज्यामध्ये निवेदिता सराफ यांच्याबरोबर अभिनेत्री जान्हवी किल्लेकर सुद्धा मोदक बनवताना दिसत आहे. दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झाला असून नेटकरी या व्हिडिओमध्ये कमेंट करताना दिसत आहे.
हे देखील वाचा – १८व्या वर्षी केलं लग्न अन् वर्षभरातच झाला घटस्फोट, सुप्रसिद्ध गायिका सुनिधी चौहानचा मोठा खुलासा, म्हणाली, “खूप चुका केल्या आणि…”
अभिनेत्री निवेदिता सराफ यांना अभिनयाव्यतिरिक्त विविध पदार्थ बनवण्याची प्रचंड आवड आहे. मालिकेदरम्यान त्यांनी अनेकदा सहकलाकारांना विविध खाद्यपदार्थ खाऊ घातलेलं आहे. शिवाय, त्यांचं स्वतःचं युट्युब चॅनेल असून त्या या चॅनेलवर विविध पदार्थांच्या रेसिपीचे व्हिडिओ पोस्ट करत असतात.