बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आधी चाळीत राहायचे तेव्हा…”, गणेशोत्सवाबाबत बोलताना शिवाली परबला आठवलं चाळीतलं घर, म्हणाली, “रात्रीचं मंडपात थांबणं आणि…”

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 18, 2023 | 3:42 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
shivali parab told her memories about ganpati

shivali parab told her memories about ganpati

गणोशोत्सव हा सण महाराष्ट्रात अगदी धुमधडाक्यात साजरा केला जातो. सप्टेंबर महिना उजाडला की चाहुल लागते ती बाप्पाच्या आगमनाची. बाप्पाच्या मुर्तीपासून ते मकर सजवण्यापर्यंत सर्व तयारी सुरू होतात. फुलांच्या माळांची सजावट पासून बाप्पाच्या आरत्या कानावर पडतात. गणेशोत्सव हा सण सगळ्यांसाठी खूप खास असतो. तसाच बाप्पा हा देखील सगळ्याच्या आवडत्या देवतांपैकी एक आहे. गणपती बाप्पा बऱ्याच नावांनी ओळखला जातो. त्यातील एक नाव म्हणजे विघ्नहर्ता. आयुष्यात आलेल्या प्रत्येक विघ्नाला दूर करण्याची ताकद फक्त बाप्पात आहे. संकटात आपण पहिली आठवण काढतो ती विघ्नहर्ता गणपती बाप्पाची. त्यामुळे बाप्पासोबत सगळ्यांच्याच विशेष आठवणी आहेत. अशीच एक आठवण ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री शिवाली परबने सांगितली. (shivali parab told her memories about ganpati)

शिवाली आपल्याला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. नुकतीच ती ‘फक्त मराठी सिनेसन्मान’ सोहळ्यात आली होती. रेड कार्पेटवर तिने केलेला खास लूक सगळ्यांच्या पसंतीस पडत आहेत. काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ती शोभून दिसत होती. त्यावेळी तिने ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या गणेशोत्सवातील आठवणी सांगितल्या. शिवालीचं मुळ गाव सिंधुदुर्गातील सावंतवाडी-वेंगुर्ले येथे आहे. ती कोकणातील असल्यामुळे गणेशोत्सवाचा कोकणात वेगळाच थाट पहायला मिळतो. कोकणातील या आठवणी शिवालीने शेअर केला. ती सांगते की, “गणपती बाप्पा माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. माझ्या प्रत्येक सादरीकरणाच्या अगोदर ‘गणपती बाप्पा मोरया’ हे नाव नेहमी मुखात असतं. त्याचं नाव घेऊनच मी माझ्या कामाला सुरुवात करते”.

आणखी वाचा – मराठी मालिकांमध्ये काम करणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री आता दिसते अशी, लग्न करुन परदेशात गेली अन्…

ती पुढे म्हणाली, “माझ्या गावातील खूप चांगल्या आठवणी आहेत. माझं गाव सावंतवाडी-वेंगुर्ले जवळच. गावी आमच्या घरी गणपती बसवतात. गावच्या घरची गणपतीसाठीची सजावट करण्यासाठी विशेष म्हणजे गव्हाच्या पिठात पाणी घालून चिक तयार करून त्याने पताके चिकटवले जातात. गणपतीच्या मकराची विशेष सजावट केली जाते. रात्री बाप्पाला आणणं या सगळ्या गोष्टी खूप भारी वाटतात. माझ्या गावच्या खूप आठवणी आहेत”,  असं म्हणत शिवानीने आपल्या गावातील आठवणींना उजाळा दिला.

View this post on Instagram

A post shared by Shivali Parab (@parabshivali)

आणखी वाचा – “आमच्या पप्पांनी श्रीलंकेला हाणला”, भारताने आशियाई चषक जिंकल्यानंतर सिद्धार्थ जाधवची मजेशीर पोस्ट चर्चेत

शिवालीने चाळीतल्या आठवणींनाही उजाळा देत सांगितलं, “मी आधी चाळीत राहायचे. त्यावेळेच्या खूप छान आठवणी आहेत. तिथे सार्वजनिक गणपती म्हणजे कमाल असायची. रात्रीचं मंडपात थांबणं व बाप्पा येण्याअगोदर रांगोळी काढणं ती रांगोळी म्हणजे चुन्याची रांगोळी. आम्ही संपुर्ण चाळीत ही रांगोळी काढायचो”, तिने चाळीतल्या बाप्पाच्या आठवणींना उजाळा दिला.   शिवानी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून महाष्ट्राच्या घराघरात पोहोचली. विविध पात्र साकारत तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने साकारलेली शिवाली अवली कोहली हे स्कीट खूप जास्त प्रसिद्ध झाली.

Tags: ganpati bappamaharashtrachi hasyajatramemoriesshivali parab
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Bigg Boss Marathi fame actress Video

Video : शेतात काम करताना दिसली प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, "शेतकऱ्यांची पावर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.