शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 : ‘बिग बॉस’च्या घरामधून अंकिता लोखंडे बाहेर पडणार?, एक चुकी अन् अभिनेत्रीची एक्झिट, प्रेक्षकही चक्रावले

अंकिता करगुटकरby अंकिता करगुटकर
डिसेंबर 14, 2023 | 2:12 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
ankita lokhande likely evicted from bigg boss 17 house

ankita lokhande likely evicted from bigg boss 17 house

‘बिग बॉस १७’ हा रिऑलिटी शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. या कार्यक्रमातील स्पर्धक अभिनेत्री अंकिता लोखंडे व तिचा पती विकी जैन यांच्यात बरीच ताणाताण पाहायला मिळाली. नुकत्याच झालेल्या भागात विकी-अंकितामध्ये पुन्हा वाद झाले आहेत. अशातच ‘बिग बॉस’च्या घरातील अंकिताबाबत एक नवीन मोठी बातमी समोर आली आहे. ‘बिग बॉस’च्या घरात अंकिताकडून झालेली एक चूक तिला बरीच महागात पडणार आहे. (ankita lokhande likely evicted from bigg boss 17 house)

‘टेली चक्कर’च्या रिपोर्टनुसार, ‘बिग बॉस १७’च्या अलीकडच्या भागात अंकिताची प्रकृती ठीक नसलेली पाहायला मिळाली होती. तिच्या तब्येतीत अचानक बिघाड झाल्यामुळे तिच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांना बिग बॉसच्या घरात बोलावण्यात आलं होतं. पण यादरम्यान अंकिताने केलेली एक वर्तवणूक ही तिला ‘बिग बॉस १७’च्या घरातून बाहेर काढण्याचं कारण ठरु शकते. अंकिताने तिच्या चेकअपसाठी आलेल्या डॉक्टरांना ‘बिग बॉस’च्या घराबाहेरील अपडेट विचारले. या गोष्टीची माहिती ‘बिग बॉस’ने घराच्या नवीन कॅप्टन मुनव्वर फारुकीला दिली. अंकिताचं डॉक्टरांशी झालेलं संभाषक ‘बिग बॉस’ मुनव्वरला हेडफोनमध्ये ऐकवतो.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

आणखी वाचा – Lal Salaam Teaser : हटके लूक, धडाकेबाज अ‍ॅक्शन अन्…; ‘लाल सलाम’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, ७३व्या वर्षीही रजनीकांत यांची मेहनत पाहून प्रेक्षक भारावले

नवीन आलेल्या प्रोमोत ही बातमी ‘बिग बॉस’ कॅप्टन मुनव्वरला दिल्यानंतर तो घरातल्या सगळ्यांना एकत्र बोलावून घेतो. त्यानंतर तो अंकिताच्या या वर्तवणूकीचा खुलासा करतो. पण या गोष्टीबाबत ती असं काही बोललीच नसल्याचं सांगत अंकिता नकार देते. यासगळ्या संभाषणात अंकिता पुन्हा दुःखी झालेली दिसते आणि पुन्हा रडताना दिसते. अंकिताचं वागणं ‘बिग बॉस’च्या घरातील नियमांच्या विरुद्ध आहे. त्यामुळे घरातील  नियमांच्या उल्लंघनामुळे ‘बिग बॉस’चे इतर स्पर्धक तिला घरातून बाहेर काढतात का हे पाहणं रंजक ठरणार आहे. आता अंकिताच्या या वर्तुवणूकीवर ‘बिग बॉस’ काय निर्णय घेईल याचा उलघडा येत्या भागांमध्ये होणार आहे.

आणखी वाचा – ‘बिग बॉस’मध्ये येण्यापूर्वी अंकिता लोखंडे-विकी जैनमध्ये मोठा वाद, बायकोला सोडूनही गेला अन्…; अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली, “१ वर्षासाठी तो…”

‘बिग बॉस १७’मध्ये आल्यापासून अंकिता लोखंडे व विकी जैन हे कपल बरंच चर्चेत आहे. घरात आल्यापासून या कपलमध्ये बरेच वाद पाहायला मिळत आहेत. त्यामुळे इतर गोष्टींबरोबर या कपलमुळे ‘बिग बॉस’च्या घरातील वातावरण नेहमीच तापलेलं पाहायला मिळतं.

Tags: actressankita lokhandebigg boss 17Munawar Faruqui
अंकिता करगुटकर

अंकिता करगुटकर

अंकिता करंगुटकर या इट्स मज्जा ऑनलाईनमध्ये रिपोर्ट पदावर कार्यरत आहे. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या घडामोडींच्या वार्तांकन करतात. मुंबई विद्यापीठामधून त्यांनी मास्टर ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (एमएसीजे) ही पदवी मिळवली. विद्यापीठात शिकत असताना ‘जय महाराष्ट्र’मध्ये इंटर्नशीप केली. त्याचबरोबर ‘तरूण भारत, गोवा’ याठिकाणी तीन महिने काम केलं आहे. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Anushka sharma troll after banglore stampede
Entertainment

“खोटं रडू नकोस, इतके पैसे कमावले पण…”, बंगळूर चेंगराचेंगरीवर पोस्ट करताच अनुष्का शर्मा ट्रोल, नेटकऱ्यांचा संताप

जून 6, 2025 | 2:30 pm
Next Post
Nava Gadi Nava Rajya Serial Off Air

'झी मराठी' वाहिनीवरील 'नवा गडी नवं राज्य' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, कलाकारही झाले भावुक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.