‘बिग बॉस १७’ हा रिअॅलिटी शो सुरु झाल्यापासून बराच चर्चेत आहे. स्पर्धकांमध्ये सुरुवातीपासून बरीच वादावादी पाहायला मिळली. अभिनेत्री अंकिता लोखंडे व तिचा नवरा विकी जैन यांच्यात सुरुवातीपासून बरीच भांडणं होताना दिसत आहेत. कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे त्यांच्या बरेच वाद होताना दिसतात. नुकतात एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात त्यांच्यात पुन्हा वाद निर्माण झाला आहे. स्वयंपाक घरातील जेवणावरून दोघांच्यात तणाव वाढला झाले. यामुळे अंकिता रडताना दिसली. यावेळी तिने खुलासा करत सांगितलं की विकी तिला अगोदरही सोडून गेला होता.(ankita lokhande reveal once Vicky jain leave her)
नुकत्याच समोर आलेल्या भागात पाहायला मिळालं की, खानाजादी अंकिताला विकीच्या आणि तिच्या लवस्टोरीबद्दल विचारते. “तुम्ही लग्न करणार हे तुम्हाला माहित होतं का?” यावर अंकिता सांगते की, “सुरुवातीला तर याबद्दल माहित नव्हतं. पण त्यानंतर विकीने मला प्रपोज केलं. पण तो १ वर्षासाठी मला सोडून गेला होता. त्यानंतर तो पुन्हा आला आणि पुन्हा त्याने मला लग्नासाठी विचारलं”. त्यानंतर खानजादीने विचारलं की, “विकी का सोडून गेला होता?” यावर खुलासा करत अंकिता म्हणाली, “माझ्यामुळेच! आमच्यामध्ये भांडणं झाली होती. पण त्यानंतर त्याने मला माफ केलं”. ‘बिग बॉस’च्या घरात बऱ्याच वेळा भांडणं झाल्यावर अंकिता विकीकडे जाताना दिसते. पण विकी तिच्याबरोबर जसा वागतो त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले आहेत. विकी यामुळे बराच ट्रोल होताना दिसतो.
नुकतीच अंकिता जेव्हा जेवण बनवत होती तेव्हा खानाजादी पुन्हा पुन्हा तिला उपदेशाचे धडे देताना दिसते. त्यामुळे अंकिता तिच्यावर भडकून सांगते की “मग तुच कर”. विकीही त्यानंतर खानजादीला जेवण बनवायला सांगतो, “तुच बनव. तसंही राशन कमी आहे त्यामुळे चांगलं जेवणं बनव”. विकीच्या या वक्तव्यामुळे अंकिता खूप दुःखी होते आणि सांगते, “तुला माझ्या हातचं जेवण नकोच आहे”.
यावर विकी विचारतो, “’बिग बॉस’च्या घराबाहेर तू किती वेळा माझ्यासाठी जेवण बनवलं?” या वाक्यावर अंकिता खूप दुःखी होते आणि रडू लागते. ती सांगते की, “मी इथे त्याच्यासाठी जेवण बनवते मात्र त्याला मी बनवलेलं जेवण जेवायला आवडत नाही दुसऱ्यांनी बनवलेलं जेवण त्याला चांगलं वाटतं”. आता ‘बिग बॉस’च्या घरात या जोडप्यांमधील भांडणं संपतं की त्यांच्यातील वाद आणखी वाढतात याचा खुलासा कार्यक्रमाच्या पुढिल भागांत होईल.