शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“अपयश नेहमी अनाथ आणि…”, ‘चला हवा येऊ द्या’ला १० वर्ष पूर्ण होताच सागर करांडेने वाचून दाखवलं भावुक पत्र, म्हणाला, “आमचे पाय जमिनीवरच…”

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 7, 2024 | 5:22 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Sagar Karande emotional letter reading video is going viral on social media

"अपयश नेहमी अनाथ आणि...", 'चला हवा येऊ द्या'ला १० वर्ष पूर्ण होताच सागर करांडेने वाचून दाखवलं भावुक पत्र, म्हणाला, "आमचे पाय जमिनीवरच..." | Sagar Karande emotional letter reading video is going viral on social media "अपयश नेहमी अनाथ आणि...", 'चला हवा येऊ द्या'ला १० वर्ष पूर्ण होताच सागर करांडेने वाचून दाखवलं भावुक पत्र, म्हणाला, "आमचे पाय जमिनीवरच..."

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय शो म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’. या प्रसिद्ध शोने गेली दहा वर्षे प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले असून नुकताच या शोला दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एक खास भाग पार पडला. या शोने दहा वर्षे प्रेक्षकांना खदखदून हसवण्याबरोबरच टचकन डोळ्यातून पाणीही आणले आणि हसवण्याबरोबरच डोळ्यातून अश्रु आणण्याचे हे काम केले ते म्हणजे लेखक अरविंद जगताप व अभिनेता सागर कारंडेने.

‘चला हवा येऊ द्या’ शोमध्ये सागर कारंडेने नानाविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. सागरने त्याच्या अनेक विनोदी भूमिकांमधून प्रेक्षकांना हसवले तर आहेच, पण त्याच्या पत्रवाचनाने अनेकांच्या डोळ्यात नकळतपणे अश्रु निखळल्याचे पाहायला मिळाले आहे आणि अगदी तसाच काहीसा अनुभव पुन्हा एकदा आला आहे. सोशल मीडियावर सागच्या पत्रवाचनाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. याद्वारे त्याने प्रेक्षकांचे आभारही मानले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – बायकोला पुरस्कार मिळताच प्रसाद जवादेचा आनंद गगनात मावेना, व्हिडीओही केला शेअर, म्हणाला, “बायको…”

या व्हिडीओमध्ये सागर पत्र वाचताना असं म्हणतो की, “यशाचे हजारो बाप असतात, पण अपयश नेहमी अनाथ असतं. पण झी मराठीच्या कुटुंबामुळे आम्ही यश पचवू शकलो आणि सगळ्यात मोठा आधार होता तो म्हणजे मराठी माणसाचा. मराठी माणूस कुणाला हवेत जाऊ देत नाही. ताबडतोब जमिनीवर आणतो. मराठी प्रेक्षक फक्त कौतुक करतात असं नाही हा. वेळ आली की कान उघडणीही करतात. त्यामुळे आमचे पाय कायम जमिनीवर राहिले”.

आणखी वाचा – जॅकलिन फर्नांडिसच्या इमारतीला आग, काही महिन्यांपूर्वीच खरेदी केलं होतं अलिशान घर, अभिनेत्रीच्या घराचं नुकसान?

दरम्यान, सागरचा हा पत्रवाचनाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून या व्हिडीओला चाहत्यांनीही चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच अनेकांनी सागरच्या पत्रवाचनाचे कौतुकही केले आहे. त्याचबरोबर अनेकजण पत्रवाचन ऐकून आम्ही खूप भावुक झाल्याच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत.  

Tags: Chala Hawa Yeu Diyaentertainment newsmarathi actorMarathi Comedy Showmarathi entertainmentmarathi entertainment newsMarathi newssagar karandeचला हवा येऊ द्यामनोरंजन बातमीमराठी अभिनेतामराठी बातमीमराठी मनोरंजनमराठी मनोरंजन बातमीमराठी विनोदी शोसागर कारंडे
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Mithun chakraborty on vaction

ब्रेनस्ट्रोकनंतर मिथून चक्रवर्ती यांचा पहिला फोटो समोर, लेक व सूनेसह सेल्फीही काढला, आता त्यांची परिस्थिती नेमकी कशी?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.