शुक्रवार, मे 16, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बायकोला पुरस्कार मिळताच प्रसाद जवादेचा आनंद गगनात मावेना, व्हिडीओही केला शेअर, म्हणाला, “बायको…”

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 7, 2024 | 11:54 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Prasad Jawade expressed his happiness after Amruta Deshmukh won the best actress award in zee natya gaurav

बायकोला पुरस्कार मिळताच प्रसाद जवादेचा आनंद गगनात मावेना, व्हिडीओही केला शेअर, म्हणाला, "बायको..."

झी गौरव पुरस्कार हा मराठी पुरस्कार सोहळ्यांपैकी एक मानाचा पुरस्कार मानला जातो. मराठी मनोरंजन सृष्टीत काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या कलाकारांच्या कौतुकास्पद कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कार सोहळ्याचे ‘झी चित्र गौरव’ व ‘झी नाट्य गौरव’ अशा दोन स्वरुपांमध्ये हे पुरस्कार दिले जातात. चित्रपट सृष्टीसंबंधित पुरस्कार ‘चित्र गौरव’ म्हणून दिले जातात, तर नाटकात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना ‘नाट्य गौरव’ पुरस्कार देऊन सन्मान केला जातो.  

अशातच काल (६ मार्च) रोजी ‘झी नाट्य गौरव पुरस्कार’ सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री अमृता देशमुखला व्यावसायिक नाटकात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर हा पुरस्कार मिळाल्यानिमित्त आनंद व्यक्त केला आहे. मात्र तिच्यापेक्षाही अमृताच्या नवऱ्याला म्हणजेच अभिनेता प्रसाद जवादेला जास्तच आनंद झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by Marathi Celeb's Katta (@marathicelebkatta)

आणखी वाचा – अखेर चर्चा खऱ्या ठरल्या, इम्रान खान पत्नी अवंतिकापासून विभक्त, लेखा वॉशिंग्टनबरोबरच्या नात्याबद्दलही केला खुलासा, म्हणाला…

अमृताला ‘झी नाट्य गौरव’चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळताच प्रसादचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. यानिमित्ताने प्रसादने एक खास व्हिडीओ शेअर करत लाडक्या बायकोचे अभिनंदन केले आहे. प्रसादने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ पोस्ट करत असं म्हटलं आहे की, “झी नाट्य गौरव २०२४ सर्वोत्कृष्ट अभिनेत्री अमृता देशमुख. मी म्हटल्याप्रमाणे मी वाट पाहत आहे. अभिनंदन बायको, माझं तुझ्यावर प्रेम आहे.”

आणखी वाचा – जॅकलिन फर्नांडिसच्या इमारतीला आग, काही महिन्यांपूर्वीच खरेदी केलं होतं अलिशान घर, अभिनेत्रीच्या घराचं नुकसान?

दरम्यान, अमृता देशमुखचे सध्या नियम व अटी लागू हे नाटक रंगभूमीवर जोरदार सुरू आहे. या नाटकात तिच्याबरोबर अभिनेता संकर्षण कऱ्हाडेही प्रमुख भूमिकेत आहे. या नाटकाचे प्रत्येक दौरे यशस्वी होत असून तिकीट बारीवर या नाटकाचे हाउसफुलचे बोर्ड झळकत आहेत. अशातच आता अभिनेत्रीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला आहे.

Tags: amruta deshmukhAwards Newsbest actressentertainment newsmarathi entertainment newsMarathi newsprasad jawadeZee Natya Gaurav Awardअमृता देशमुखझी नाट्य गौरव पुरस्कारपुरस्कार बातमीप्रसाद जवादेमनोरंजन बातमीमराठी बातमीमराठी मनोरंजन बातमीसर्वोत्कृष्ट अभिनेत्री
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Water Disadvantages
Lifestyle

तुम्हीही जास्त पाणी पीत आहात का?, फायद्यापेक्षा तोटेच अधिक, नक्की काय होतं?

मे 16, 2025 | 7:00 pm
aamir khan gf gauri airport video
Entertainment

Video : ६०व्या वर्षी आमिर खान प्रेमात, दोन घटस्फोटानंतर रिलेशनशिप, तिच्या खांद्यावर डोकं ठेवत…

मे 16, 2025 | 6:16 pm
Siddhivinayak temple news
Social

हातावरचं पोट, घर भाडं, कमाईच नाही आणि…; सिद्धीविनायक मंदिरात हार, नारळ बंद करताच विक्रेत्यांचे हाल, गरीब परिस्थितीत…

मे 16, 2025 | 4:50 pm
KRK On Muslims
Entertainment

“भारतातील मुस्लिम खूप आनंदी आणि…”, बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “रस्त्यावर मरत…”

मे 16, 2025 | 3:44 pm
Next Post
Aai Kuthe Kay Karte Promo

'आई कुठे…'मध्ये अरुंधतीच्या दुसऱ्या नवऱ्याचे निधन दाखवताच भडकले प्रेक्षक, मालिका बंद करण्याची मागणी, म्हणाले, "तिचा तिसरा नवरा आणा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.