बॉलीवूडमध्ये ‘डिस्को डान्सर’ म्हणून ओळख असणारे मिथुन चक्रवर्ती यांनी बराच काळ बॉलिवूडवर राज्य केले आहे. मिथुन यांनी आपल्या जबरदस्त अभिनयाने सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अनेक चित्रपटांमधून त्यांनी विविध भूमिका साकारल्या असून डान्स रिॲलिटी शोचे परीक्षक म्हणून काम पाहत होते. पण काही दिवसांपूर्वीच ते खूप आजारी पडले आणि त्यांना रुग्णालयात भरती करावे लागले होते. (Mithun chakraborty on vaction)
फेब्रुवारी महिन्यामध्ये मिथुन यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. तेव्हा फक्त तपासणीसाठी नेट असल्याचे सांगण्यात आले होते. नंतर मात्र त्यांना ब्रेन स्ट्रोक असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. काही काळ त्यांच्यावर उपचार सुरू राहिले. काही दिवसांपूर्वीच मिथुन यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. ते आता थोडे बरे झाले असून लेक मिमोह चक्रवर्ती व सून मदालसा शर्मा यांच्याबरोबर सुट्टीवर निघाले आहेत. या तिघांचाही एक फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
या फोटोमध्ये मिथुन,मिमोह व मदालसा एकत्रित दिसत आहेत. हा फोटो विमानातील असून मिथुन यांच्या तोंडाला मास्क दिसत आहे. मिथुन यांना ठणठणीत पाहून चाहत्यांना आनंद होत आहे. मिथुन यांची सून मदालसाने विमानातील फोटो शेअर केला आहे.या फोटोवर चाहत्यांनी ते लवकर बरे व्हावेत अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
ब्रेन स्ट्रोकवर यशस्वी उपचारानंतर मिथुन आता रिकव्हर होत आहेत. ते आपल्या तब्येतीची चांगली काळजी घेत आहेत. तसेच आपल्या कुटुंबाबरोबही पूर्ण वेळ घालवत आहेत. मिथुन उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी राजकारणातील अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती. मात्र यावेळी मिथुन यांना ओळखणेही कठीण झाले आहे.
मिथुन यांनी ‘काबुलीवाला’ या चित्रपटामध्ये भूमिका साकारली होती. आतापर्यंत त्यांनी ‘डान्स इंडिया डान्स’ या डान्स रिॲलिटी शोचे सुपरजज म्हणूनही काम पाहिले आहे.