शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अभिजीत खांडकेकरने बायकोचं केलं कौतुक, खास पोस्ट शेअर करत म्हणाला, “सगळ्यात जवळचा साक्षीदार…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 29, 2024 | 8:00 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Actor Abhijeet Khandkekar shared an appreciation post on social media for his wife Sukhda see the details

अभिजीत खांडकेकरने बायकोचं केलं कौतुक, खास पोस्ट शेअर करत म्हणाला, “सगळ्यात जवळचा साक्षीदार...”

‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ मालिकेतून अवघ्या महाराष्ट्राच्या गळ्यातील ताईत झालेला अभिनेता म्हणजे अभिजीत खांडकेकर. मराठी मालिका, चित्रपट तसेच वेबसीरिजमध्ये अभिनय करत अभिजीतने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. सध्या तो स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गत आहे’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. अभिजीत हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो, सोशल मीडियाद्वारे तो त्याचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो. अशातच त्याने नुकतीच एक पोस्ट केली आहे ज्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. (Abhijeet Khandkekar On Instagram)

अभिजीतने त्याच्या सोशल मीडियावर पत्नीसाठी एक खास पोस्ट केली आहे. अभिजीतप्रमाणे सुखदादेखील उत्तम अभिनेत्री आहे. सध्या ती ‘अजातशत्रू’ या हिंदी नाटकात झळकत आहे. त्याने या नाटकाचा प्रयोग पाहून तिच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्ट मध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “काल इब्सेन फेस्टीवलमधील इला अरूण यांनी रूपांतरीत केलेलं आणि इला अरूण आणि के.के.रैना सरांनी दिग्दर्शित केलेलं ‘अजातशत्रू’ हे हिंदी नाटक पाहायचा योग आला. अत्यंत गंभीर विषयावरचं पण तितकंच प्रभावीपणे सादर केलेलं नाटक सगळ्यांनी पहावं असच आहे.”

View this post on Instagram

A post shared by Abhijeet Khandkekar (@abhijeetkhandkekar)

आणखी वाचा – Bigg Boss 17 Grand Finale : ‘बिग बॉस’ विजेत्याच्या स्वागतासाठी चाहत्यांची गर्दी अन्…; डोंगरी परिसरात सुरु झाली लगबग, व्हिडीओ व्हायरल

यापुढे अभिजीतने पत्नीचे कौतुक करत असे म्हटले की, “या सगळ्यात उठून दिसणारी – सुखदा. तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे. एकाच नाटकात दोन पात्रांचा अभ्यास करणं आणि त्या दोन्हींपैकी कुठलं छान साकारलं म्हणून प्रेक्षकांना तितकंच बुचकळ्यात पाडावं हे तुच करू जाणे. प्रत्येक प्रोजेक्टच्या वेळेसची तुझ्या मेहेनतीचा मी सगळ्यात जवळचा साक्षीदार आहे. इतकी मेहनत, इतकं समर्पण, प्रत्येक गोष्ट परिपूर्ण व्हावी म्हणून असलेला पराकोटीचा अट्टाहास व तळमळ बघून एखाद्या वर्गात सतत पहिल्या येणाऱ्या मुलीबद्दल जशी असुया वाटते ना तशी वाटते आणि त्याचबरोबर अभिमानही वाटतो. इतकं सगळं करुन मंचावरचा तुझा वावर, तुझं सहज ते पात्र होऊन जाणं, हिंदीवरचं प्रभुत्व प्रेक्षकांना खिळवून ठेवत नसेल तर नवलच. खूप प्रेम व प्रचंड आदर”.

आणखी वाचा – मुग्धा करतेय प्रथमेशचे लाड, नवऱ्याच्या उपवासादिवशी बनवला खास पदार्थ, फोटो शेअर करत म्हणाला, “बायको…”

अभिजीतच्या या पोस्टवर या पोस्टवर सुखदा खांडकेकरनेही कमेंट करत “तू (अभिजीत) आहेस म्हणून मी आहे. माझं तुझ्यावर प्रेम आहे”, असे म्हटले आहे. त्याचबरोबर चाहत्यांनीही लाईक्स व कमेंट्सद्वारे या पोस्टवर सुखदावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Tags: abhijeet khandkekarentertainment newsmarathi actormarathi actressmarathi entertainmentmarathi entertainment newsMarathi newsSukhda Khandkekarअभिजीत खांडकेकरमनोरंजन बातमीमराठी अभिनेतामराठी अभिनेत्रीमराठी बातमीमराठी मनोरंजनमराठी मनोरंजन बातमीसुखदा खांडकेकर
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Singer mugdha Vaishampayan shared video of her andman trip on social media see the details

Video : सहा दिवसांच्या अंदमान टूरनंतर प्रथमेशच्या भेटीसाठी मुग्धाची लगबग, कुटुंबियांसाठी खास भेटवस्तू आणल्या अन्...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.