Bigg Boss Season 17 Grand Finale Updates : ‘बिग बॉस १७’च यंदाचं पर्व विशेष गाजलं. ‘बिग बॉस’च्या घरातील प्रत्येक स्पर्धकाचा खेळ पाहणं रंजक ठरलं. शेवटी पाच स्पर्धक या अटीतटीच्या लढाईत राहिले. दरम्यान या पाच स्पर्धांपैकी सुप्रसिद्ध कॉमेडियन मुनव्वर फारुकीने यंदाच्या ‘बिग बॉस’ पर्वाच्या विजेतेपदावर नाव कोरले. अगदी खडतर प्रवास सुरु करत, वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून एंट्री घेत मुनव्वरने स्वतःला सिद्ध करत ‘बिग बॉस’ची ट्रॉफी आपल्या नावे केली. सर्व स्तरातून मुनव्वरच कौतुक होताना पाहायला मिळत आहे.
‘बिग बॉस’च विजेतेपद जिंकल्यानंतर मुनव्वरने सलमान खान व ट्रॉफीबरोबरचा फोटो शेअर केला. हा फोटो शेअर करत त्याने सोशल मीडियावरुन शेअर केलेल्या पहिल्या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्याच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केलेला पाहायला मिळत आहे. ही पोस्ट शेअर करत, “खूप खूप आभार जनता. तुमचं प्रेम व पाठिंब्यामुळे ट्रॉफी अखेर डोंगरीला आलीच. मार्गदर्शनासाठी मोठे भाऊ सलमान खान यांचे विशेष आभार”, असं म्हटलं आहे.
अखेर मुनव्वरने म्हटल्याप्रमाणे यंदाच्या ‘बिग बॉस’ पर्वाची ट्रॉफी मुनव्वर डोंगरीत घेऊन यायला निघाला आहे. दरम्यान नुकताच एक डोंगरी परिसरातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये असे पाहायला मिळत आहे की, मुनव्वरच्या स्वागतासाठी त्याच्या चाहत्यांनी गर्दी केली आहे. रस्त्यावर मुनव्वरला शुभेच्छा देणारे मोठमोठे बॅनर लावण्यात आले आहेत. तर रस्त्यावर गर्दी होईल इतके चाहते जमले आहते. ही गर्दी संभाळण्यासाठी पोलिसही तैनात झालेले पाहायला मिळत आहे.
बिग बॉस १७’च्या विजेत्याला म्हणजेच मुनव्वर फारुकीला ‘बिग बॉस’च्या आकर्षक ट्रॉफीसह रोख रक्कम ५० लाख रुपये व एक अलिशान कारही बक्षीस म्हणून मिळाली आहे.