सध्याच्या तरुण पिढीतील काही आघाडीच्या गायकांमधील लोकप्रिय गायक – गायिका म्हणजे प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायन. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स्’ या लोकप्रिय कार्यक्रमातून प्रसिद्ध झालेल्या मुग्धा-प्रथमेश यांनी अवघ्या रसिक श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेतला. आपल्या सुमधुर आवाजाने या जोडीने साऱ्यांनाच मंत्रमुग्ध केले. आपल्या गायनाने चर्चेत असणारी ही जोडी नुकतीच त्यांच्या लग्नामुळेदेखील चांगलीच चर्चेत आली.
गायनात तरबेज असणारी मुग्धा-प्रथमेश ही जोडी सोशल मीडियावरदेखील तितकीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ते त्यांच्या अनेक अपडेट्स चाहत्यांना देत असतात आणि त्यांची ही केमिस्ट्री चाहत्यांनादेखील भलतीच आवडते. दरम्यान गेले काही दिवस मुग्धा व प्रथमेश हे दोघे त्यांच्या गायनाच्या कार्यक्रमानिमित्त एकमेकांपासून दूर होते. त्यामुळे या काळात त्यांनी एकमेकांना मिस केल्याचं पाहायला मिळालं होतं. मुग्धा तिच्या कामानिमित्त अंदमानला गेली होती आणि तेव्हा तिने तिथे प्रथमेशला खूपच मिस केले. अशातच तिने नुकताच तिच्या या अंदमान ट्रीपचा एक खास व्हिडीओ तिच्या सोशल मीडियाद्वारे शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये मुग्धाने असं म्हटलं आहे की, “मी माझी अंदमानची टुर पूर्ण केली असून आता मी पुण्याला जात आहे. त्यासाठी मी आता बॅग भरून पुण्याला जायला निघणार आहे. लग्नानंतर प्रथमच मी ६ दिवसांच्या या टुरवर आले होते आणि आता मी पुन्हा घरी जायला अन् प्रथमेशला भेटायला उत्सुक आहे.” तसेच या व्हिडीओमध्ये ती मी अंदमानवरून माझे आई-बाबा, प्रथमेशचे आई-बाबा म्हणजेच सासू-सासरे, नवरा प्रथमेश व बहीण यांच्यासाठी भेटवस्तू घेत असल्याचेही म्हणते.
आणखी वाचा – अभिजीत खांडकेकरने बायकोचं केलं कौतुक, खास पोस्ट शेअर करत म्हणाला, “सगळ्यात जवळचा साक्षीदार…”
तसेच या व्हिडीओमध्ये ती तिच्या परतीच्या प्रवासासाठी बॅग भरताना दिसत आहे, त्यानंतर ती अंदमान विमानतळावरील काही दृश्ये दाखवते, त्याचबरोबर ती अंदमानवरुन आई-बाबा, सासू-सासरे, नवरा प्रथमेश व बहिण मृदुलसाठी काही खास भेटवस्तूदेखील घेत असल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. त्यांतर ती पुण्यात पोहोचताच प्रथमेश तिला घ्यायला आलेला असल्याचे पाहायला मिळत आहे आणि दोघे एकमेकांना बघून भलतेच उत्सुक झाल्याचे दिसत आहेत.
आणखी वाचा – “मला लग्न करायची हौस होती पण…”, जुई गडकरी लग्नासाठी आहे उत्सुक, म्हणाली, “योग जुळून…”
दरम्यान, मुग्धाने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे प्रतिसाद दिला आहे. तसेच सुकन्या मोने व तन्वी पालव या कलाकारांसह त्यांच्या अनेक चाहत्यांनी या व्हिडीओवर “किती गोड, खूप छान, खूपच मस्त, तुमची जोडी खूपच सुंदर आहे, कायम असेच एकत्र व आनंदी राहा” अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत.