मराठीतील सध्याच्या तरुण पिढीतील गायक्-गायिकांपैकी लोकप्रिय जोडी म्हणजे गायक प्रथमेश लघाटे व गायिका मुग्धा वैशंपायन. मुग्धा-प्रथमेश ही जोडी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियाद्वारे ते त्यांच्या गायनाच्या कार्यक्रमाची माहिती किंवा काही दैनंदीन अपडेट्स देत असतात. सोशल मीडियाद्वारे ते त्यांचे काही खास फोटो व व्हिडीओदेखील शेअर करत असतात. (Mugdha Vaishampayan prepared special fasting dish for Prathamesh Laghate)
मुग्धा-प्रथमेश यांचा गेल्या महिन्यात शुभविवाह पार पडला. त्यांच्या लग्नाचे काही खास फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर मध्यंतरी मुग्धा व प्रथमेश त्यांच्या कामानिमित्त एकमेकांपासून दूर होते, तेव्हा सोशल मीडियाद्वारे खास पोस्ट शेअर करत दोघे एकमेकांना मिस करत असल्याचे पाहायला मिळाले. अशातच आता दोघेही एकत्र आले असून मुग्धाने नुकताच संकष्टीनिमित्त खास पदार्थही बनवला.
प्रथमेशने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर त्या खास उपवासाच्या पदार्थाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोसह त्याने “संकष्टीच्या उपवासानिमित्त माझ्या प्रिय बायकोने केलेली तयारी” असं म्हटलं आहे आणि या फोटोबरबरच त्याने मुग्धाला टॅगदेखील केलं आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुग्धा-प्रथमेश हे सोशल मीडियावर चर्चेत आहेत. मुग्धा-प्रथमेश यांची केमिस्ट्रीदेखील त्यांच्या चाहत्यांना कायमच आवडते. अशातच प्रथमेशने शेअर केलेल्या या फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे.