शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तिच्या आईबरोबर असते तेव्हा…”, आदिनाथ कोठारेने सांगितलं त्याचं कसं आहे लेकीबरोबर नातं, म्हणाला, “आम्ही दोघं…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 18, 2024 | 11:37 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Marathi actor adinath kothare talk about how his bond with daughter jija see the details

"तिच्या आईबरोबर असते तेव्हा...", आदिनाथ कोठारेने सांगितलं त्याचं कसं आहे लेकीबरोबर नातं, म्हणाला, "आम्ही दोघं..."

अभिनेता आदिनाथ कोठारे हा मराठी मनोरंजन सृष्टीतील काही लोकरपरिया अभिनेत्यांपैकी एक आहे. आदिनाथने मराठीसह हिंदी चित्रपट व वेबसीरिजमध्ये काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आदिनाथने २०११ मध्ये उर्मिलासह विवाहगाठ बांधली. मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपलपैकी एक म्हणून ओळखले जातात. सिनेसृष्टीत कायमच चर्चेत राहणाऱ्या या जोडीमध्ये गेल्या काही दिवसांपासून काहीतरी बिनसलं असल्याची चर्चा सुरु आहे.

उर्मिला ही कोठारे कुटुंबातून विभक्त राहत असल्याची चर्चाही सुरु आहे. अशातच आता आदिनाथने त्याची लेक जिजा कोणाबरोबर राहते याचा खुलासा केला आहे. नुकतंच आदिनाथने झी 24 तास या वाहिनीला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने जिजा व त्याच्या नात्यावर भाष्य केले असून ती जास्त कोणाबरोबर असते, याबद्दलही त्याने सांगितले.

View this post on Instagram

A post shared by Addinath M Kothare (@adinathkothare)

आणखी वाचा – Bigg Boss 17 : “तू खूप…”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा अंकिता लोखंडेला पाठिंबा, म्हणाली “खरी व प्रामाणिक…”

यावेळी आदिनाथने असे म्हटले की, “जिजा ही अगदी माझ्यासारखी आहे. ती जिथे असेल तिथे ती आनंदात असते. जिजाला सर्वात जवळ आई आहे. पण आमचं नातंही खूप गंमतीशीर आहे. तिची आई तिला भरवते. तिचे लाड करते. ती जेव्हा तिच्या आईबरोबर असते, तेव्हा ती आई-आई करत असते. पण जेव्हा ती डॅडाबरोबर असते किंवा आम्ही दोघं कुठे फिरायला गेलो. तर ती एका समजुतदार व मोठ्या मुलीप्रमाणे वागते.”

आणखी वाचा – ‘मन उडू उडू झालं’ फेम ‘या’ अभिनेत्याची ‘धर्मवीर २’ चित्रपटात वर्णी, साकारणार ‘ही’ भूमिका, खास फोटो शेअर करत म्हणाला…

यापुढे तो असं म्हणाला की, “ती माझ्याबरोबर असताना एखाद्या समंजस मुलीसारखी असते. ती स्वत:हून सर्व गोष्टी करते. आम्ही मध्यंतरी फिरायला गेलो होतो, तेव्हा ती हॉटेलमध्ये स्वत:च्या हाताने जेवत होती. ती फक्त पाच वर्षांची आहे. माझं जिजासोबत एका छान मित्रासारखं नातं आहे आणि मला तसंच ते आयुष्यभर ठेवायचं आहे.”

Tags: adinath kothareentertainment newsJijamarathi actormarathi actressmarathi couplemarathi entertainmentmarathi entertainment newsurmila kothareआदिनाथ कोठारेउर्मिला कोठारेजिजामनोरंजन बातमीमराठी अभिनेतामराठी अभिनेत्रीमराठी कपलमराठी मनोरंजनमराठी मनोरंजन बातमी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Saie Tamhankar On Marriage

"भीतीदायक आणि…", लग्न या संकल्पनेवर सई ताम्हणकरचं वेगळंच मत, म्हणाली, "ते एक कोडं जे सोडवताना…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.