गेल्या वर्षात धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाने चाहत्यांच्या मनावर गारुड घातले. अभिनेता प्रसाद ओकने या चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवरही तूफान प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाच्या शेवटी त्याच्या दुसऱ्या भागाची चाहूल प्रेक्षकांना देण्यात आली होती. तेव्हापासून अनेक चाहते या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची वाट पाहत आहेत. (Ruturaj Phadke On Instagram)
अशातच नुकतीच चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘धर्मवीर’चा पुढील भाग ‘धर्मवीर २’ची घोषणा केली आणि या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवातदेखील झाली आहे. या चित्रपटात काही पात्रे ही पहिल्या भागातलीच असून काही पात्रे नवीन असणार आहेत. अशातच ‘धर्मवीर २’ या चित्रपटात ‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील अभिनेता ऋतुराज फडके पाहायला मिळणार आहे. ऋतुराजने नुकतेच सोशल मीडियावर ‘धर्मवीर २’ चित्रपटाच्या सेटवरील काही खास फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे.
हेही वाचा – आदिनाथ कोठारेशी जोडलं गेलं पूजा सावंतच नाव, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, “तो फोटो पोस्ट केल्यानंतर…”
ऋतुराजने शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये ऋतुराज दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्याबरोबर पाहायला मिळत आहे. तर दुसरा व तिसरा फोटो त्याने त्याच्या पात्राच्या वेशभूषेत काढला आहे. अर्थात तो या चित्रपटात नक्की कोणत्या भूमिकेत झळकणार आहे? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. ऋतुराज याआधी मन उडू उडू झालं या मालिकेत दिसला होता. या मालिकेमधील त्याच्या कामाचे कौतुक करण्यात आले होते. यानंतर त्याने अनेक मालिकांमध्ये काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे आणि आता तो ‘२१७ पद्मिनी धाम’ या नाटकात काम करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
हेही वाचा – “दगडूची होती काजू कतली….” प्रथमेश परबचा होणाऱ्या बायकोसाठी हटके उखणा म्हणाला, “खूप मेहनतीने पटली अन्…
दरम्यान, धर्मवीर २ या चित्रपटाचे शूटिंग सध्या ठाण्यामध्ये सुरू असून ‘धर्मवीर’च्या या आगामी भागात प्रेक्षकांना काय नवीन पाहायला मिळणार यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. तसेच ऋतुराज हा अभिनेतादेखील या चित्रपटात कोणत्या भूमिकेत पाहायला मिळणार यासाठी त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.