कलर्स वाहिनीवरील ‘बिग बॉस’ हा बहूचर्चित शो आता अंतिम टप्प्यात आला आहे.त्यामुळे घरातील स्पर्धकांमध्ये अंतिम लढतीसाठी जोरदार प्रयत्न चालू आहेत. घरातील प्रत्येक स्पर्धकांमध्ये अंतिम फेरीत जाण्यासाठी चुरशीची लढत पहायला मिळत आहे. त्यामुळे घराबाहेरुन अनेकजण आपल्या आवडत्या स्पर्धकाला जिंकवण्यासाठी पाठिंबा देत असल्याचे पाहायला मिळत आहे. यात सामान्य प्रेक्षकांसह कलाकार मंडळीदेखील त्यांच्या आवडत्या स्पर्धकाला जिंकवण्यासाठी समर्थन देत आहेत. (Abhidnya Bhave Give Support To Ankita Lokhande)
सोशल मीडियावर अनेक सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळी आपल्या आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा देत असतानाचे पाहायला मिळत आहे. अंकिता लोखंडे ही या घरातील मुख्य आकर्षण बनली आहे. घरात गेल्याच्या पहिल्या दिवसापासूनच ही अभिनेत्री विविध कारणांनी चर्चेत आहे. अंकिताची या शोमध्ये येण्याआधीची लोकप्रियता हे जगजाहीर आहेच. आणि या शोमुळे ती आणखीनच लोकप्रिय झाली आहे. त्यामुळे अनेक स्तरातून तिला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे.
अशातच आता मराठमोळी अभिनेत्री अभिज्ञा भावे हिनेदेखील अंकिता लोखंडेल तिचा पाठिंबा दर्शवला आहे. अभिज्ञाने तिच्या सोशल मीडियावर अंकितासाठी खास पोस्ट शेअर करत पाठिंबा दिला आहे. अभिज्ञाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीला अंकिताचा खास फोटो पोस्ट करत “तू खरंच खूप दयाळू आहेस. त्यामुळे या प्रामाणिक मुलीला कृपया मत द्या” असं म्हणत तिने अंकिता लोखंडेला बिग बॉसच्या अंतिम सामन्यासाठी शुभेच्छादेखील दिल्या आहेत.
आणखी वाचा – “दगडूची होती काजू कतली….” प्रथमेश परबचा होणाऱ्या बायकोसाठी हटके उखणा म्हणाला, “खूप मेहनतीने पटली अन्…”
दरम्यान, अंकिता लोखंडेला मिळत असलेल्या पाठिंबा व समर्थनामुळे तीच या शोची विजेती ठरणार असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. यापूर्वीही बॉलिवूड विश्वातून रश्मी देसाई, राखी सावंत, कंगना रानौतसह अभिनेत्री सनी लिओनीने सोशल मीडियावर अंकिता लोखंडेला पाठिंबा दिला असल्याचे पाहायला मिळाले आहे.