अभिनेता आदिनाथ कोठारे हा मराठी मनोरंजन सृष्टीतील काही लोकरपरिया अभिनेत्यांपैकी एक आहे. आदिनाथने मराठीसह हिंदी चित्रपट व वेबसीरिजमध्ये काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आदिनाथने २०११ मध्ये उर्मिलासह विवाहगाठ बांधली. मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपलपैकी एक म्हणून ओळखले जातात. सिनेसृष्टीत कायमच चर्चेत राहणाऱ्या या जोडीमध्ये गेल्या काही दिवसांपासून काहीतरी बिनसलं असल्याची चर्चा सुरु आहे.
उर्मिला ही कोठारे कुटुंबातून विभक्त राहत असल्याची चर्चाही सुरु आहे. अशातच आता आदिनाथने त्याची लेक जिजा कोणाबरोबर राहते याचा खुलासा केला आहे. नुकतंच आदिनाथने झी 24 तास या वाहिनीला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने जिजा व त्याच्या नात्यावर भाष्य केले असून ती जास्त कोणाबरोबर असते, याबद्दलही त्याने सांगितले.
आणखी वाचा – Bigg Boss 17 : “तू खूप…”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा अंकिता लोखंडेला पाठिंबा, म्हणाली “खरी व प्रामाणिक…”
यावेळी आदिनाथने असे म्हटले की, “जिजा ही अगदी माझ्यासारखी आहे. ती जिथे असेल तिथे ती आनंदात असते. जिजाला सर्वात जवळ आई आहे. पण आमचं नातंही खूप गंमतीशीर आहे. तिची आई तिला भरवते. तिचे लाड करते. ती जेव्हा तिच्या आईबरोबर असते, तेव्हा ती आई-आई करत असते. पण जेव्हा ती डॅडाबरोबर असते किंवा आम्ही दोघं कुठे फिरायला गेलो. तर ती एका समजुतदार व मोठ्या मुलीप्रमाणे वागते.”
यापुढे तो असं म्हणाला की, “ती माझ्याबरोबर असताना एखाद्या समंजस मुलीसारखी असते. ती स्वत:हून सर्व गोष्टी करते. आम्ही मध्यंतरी फिरायला गेलो होतो, तेव्हा ती हॉटेलमध्ये स्वत:च्या हाताने जेवत होती. ती फक्त पाच वर्षांची आहे. माझं जिजासोबत एका छान मित्रासारखं नातं आहे आणि मला तसंच ते आयुष्यभर ठेवायचं आहे.”