Bigg Boss Latest Updates : ‘बिग बॉस १७’ च्या घरात पहिल्या दिवसापासूनच कायम चर्चेत राहिलेले स्पर्धक म्हणजे अंकिता लोखंडे व तिचा पती विकी जैन. हे दोघे शोच्या पहिल्या दिवसापासूनच कायम चर्चेत राहिले आहेत. अंकिता-विकी यांच्यात अनेकदा अनेक कारणावरून खटके उडाले असल्याचे पाहायला मिळाले आहे. अंकिताला तिच्या नवऱ्याच्या वाईट वागणुकीलादेखील समोरे जावे लागले असल्याचे या शोमधून पहायला मिळाले आहे.
अशातच नुकत्याच झालेल्या एका भागामध्ये विकीने एक अशी गोष्ट सांगितली. ज्यावरुन त्याला त्याची चूक कळली आहे आणि त्याचा त्याला पश्चात्तापदेखील झाला आहे. नुकत्याच झालेल्या एका भागात ड्रेसिंग रूममध्ये अंकिता लोखंडेने आयशा खानला “बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्यापूर्वी तिला तिच्यात कोणता बदल करायला आवडेल?”, असा प्रश्न विचारला. ज्यावर उत्तर देत तिने असे म्हटले की, “ती एक दिवसापूर्वे घडलेली घटना बदलू इच्छिते.” यावेळी ड्रेसिंग रूममध्ये अंकिता, आयेशासह मुनवर फारुकी व विकी जैनहेदेखील होते.
मुन्नवरनेही यावेळी असे म्हटले की, “रागाच्या भरात माझ्याकडून बाटली फोडल्याची घटना घडली होती, त्यामुळे संधी मिळाली तर ती एक घटना मला बदलायला आवडेल.” यावर अंकिताने त्याला पुन्हा याव्यतिरिक्त आणखी काय बदल करायला आवडेल असे विचारले, यावर त्यानेही “याशिवाय दुसरे काही बदलायचे नाही.” असे उत्तर दिले. यानंतर मुन्नवर विकीला त्याच प्रश्नाचे उत्तर विचारतात. यावर विकी उत्तर देत असे म्हणतो की, “मी माझ्या पत्नीशी अधिक चांगले वागायला हवे होते. याशिवाय मला माझ्या खेळात काहीही बदल करायला आवडणार नाही”.
हेही वाचा – “तुझा घटस्फोट झाला आहे का?”, जुई गडकरीला चाहत्याने विचारला थेट प्रश्न, अभिनेत्री म्हणाली, “अहो लग्न…”
दरम्यान, विकीच्या या वक्तव्यावर अंकिता हसली. विकी-अंकिता यांच्या याआधीच्या एका संभाषणात विकीने असे म्हटले होते की, अंकितामुळे त्याने अनेकांशी अंतर निर्माण केले असून तिच्यामुळे त्याने अनेकांशी संवाद कमी केला असल्याचे म्हटले होते. तसेच गेल्या आठवड्यात अंकीताने मन्नारा व विकी यांच्यातील वाढत्या जवळीकीबद्दल त्याचबरोबर घरातील विकीच्या इतरांबद्दलच्या जवळीकीबद्दल कधीही हेवा वाटला नसल्याचे म्हटले.