स्टार प्रवाह वहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका सध्या चांगलीच गाजत आहे. गेले अनेक आठवडे टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका अव्वल ठरत आहे. याच मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. जुईने आपल्या सोज्वळ अभिनयाने व निरागस सौंदर्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सायली या भूमिकेतून जुई ही नेहमीच चर्चेत राहते. त्याचबरोबर जुई ही तिच्या सोशल मीडियाद्वारेदेखील कायमच चर्चेत राहत असते.
जुई ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते आणि चाहतेदेखील तिच्याविषयीच्या प्रत्येक अपडेट्स जाणून घेण्यात उत्सुक असतात. अशातच सायलीने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे प्रश्नउत्तराचा एक खास सेगमेंट खेळला. यात तिला चाहत्यांनी तिच्याविषयी आणि तिच्या लग्नाविषयी अनेक् प्रश्न विचारले आणि चाहत्यांच्या अनेक प्रश्नांनादेखील जुईने तिच्या खास शैलीत उत्तरे दिली.

यांपैकी एका प्रश्नाने जुईसह साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले. यात जुईला तिच्या एका चाहत्याने “तुझा घटस्फोट झाला आहे का?” असा प्रश्न विचारला. यावर जुईनेदेखील या नेटकऱ्याच्या प्रश्नाला उत्तर देत असे म्हटले की, “अहो, घटस्फोट व्हायला आधी लग्न तर होऊद्या.” दरम्यान नेटकऱ्याच्या या प्रश्नाने जुईलादेखील बुचकळ्यात पाडले आहे. जुईने या खास प्रश्नाचे उत्तर देत हसण्याचे व एक वैतागलेल्या बाईचे खास एमोजी सेंड केले आहेत.
हेही वाचा – मालिकाविश्वात लोकप्रिय असणाऱ्या जुई गडकरीने व्यक्त केली चित्रपटात काम करण्याची इच्छा, म्हणाली, “कोणी ऑफर…”
दरम्यान, जुईने तिच्या चाहत्यांच्या अशा अनेक हटके प्रश्नांना उत्तरे देत त्यांचे मनोरंजन केले आहे. तसेच या प्रश्नोत्तराच्या खेळात तिच्या अनेक चाहत्यांनी ती लग्न कधी करणार आहे? याविषयीचे अनेक प्रश्न विचारले आहेत. त्यामुळे जुई आता कधी लग्न करणार याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.