Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’चा फिनाले जसजसा जवळ येत आहे तसा हा शो अधिक रंजक होत असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’ मध्ये सध्या फॅमिली वीक सुरु असलेला पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात अभिनेत्री अंकिता लोखंडे व विकी जैन विशेष चर्चेत आले. अंकिता लोखंडेने पती विकीसह ‘बिग बॉस’च्या घरात हजेरी लावली. बिग बॉसच्या घरात आल्यापासून या जोडप्यामध्ये वाद सुरु झालेले पाहायला मिळाले. दरम्यान कालांतराने हा वाद इतका वाढला की त्यांच्या कुटुंबीयांनीदेखील यावर आक्षेप घेतलेला पाहायला मिळाला.
सध्या ‘बिग बॉस’च्या घरात फॅमिली वीक सुरु असलेला पाहायला मिळत आहे. दरम्यान स्पर्धकांचे कुटुंबीय त्यांना भेटायला कार्यक्रमात येत आहेत. सर्वच पालक आपल्या मुलांना खेळ व त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत खूप काही समजावून सांगत आहेत, मात्र विकी जैनची आई यांनी तिच्या सुनेला न समजावता तिला चार गोष्टी ऐकवताना दिसल्या. यानंतर घराबाहेर आल्यानंतरही रंजना जैन या आपल्या सुनेबद्दल खूप काही बोलल्या. त्यामुळे अंकिताच्या चाहत्यांनी तिच्या सासूवर नाराजी दर्शविली.
या सगळ्यामध्ये अंकिताची ऑनस्क्रीन सासू उषा नाडकर्णी यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. अंकिता लोखंडेने लोकप्रिय अशा ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. या मालिकेमध्ये उषा नाडकर्णी यांनी अंकिताच्या सासूची भूमिका साकारली होती. आता अंकिता व विकीच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मीडियामध्ये अनेक प्रश्नोत्तरे केली जात आहेत हे पाहता उषा नाडकर्णी यांनी इंस्टाग्रामवर अंकिताच्या लग्नाचे काही फोटो व व्हिडीओ शेअर करत,”अंकिता-विकीच लग्न काही मीडिया मसाला वा सार्वजनिक समस्या नाही. कोणत्याही प्रकारची टिप्पणी करुन त्यांचं हे नातं खराब करु नका. कारण त्याने अधिक समस्या उद्भवू शकतात”.
दरम्यान, रिद्धी डोगरा हिने अंकिता लोखंडे जिंकण्यासाठी प्रार्थना केली. तसेच तिने ट्विटद्वारे विकी जैनवर टीकाही केलेली पाहायला मिळाली. फलक नाजने अंकिता लोखंडेच्या सासूबाईंच्या मुलाखतीचा एक व्हिडीओ शेअर केला आणि त्यात लिहिले होते की, “अजूनही आंटी, तुम्ही व तुमचा राजा मुलगा तिचा अपमान करण्यास मागे हटत नाही. व्वा आंटी. मी अंकिताला सपोर्ट करत नाही, पण मी या गोष्टीलाही सपोर्ट करत नाही. हे न पचण्यासारखे आहे” असं म्हटलं.