शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 : नवऱ्याला लाथ मारल्यानंतर सासूने अंकिता लोखंडेला सुनावलं, अभिनेत्रीच्या आईला फोन करत संस्कारही काढले, म्हणाल्या “तुम्ही तुमच्या नवऱ्याला…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 9, 2024 | 10:53 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
bigg boss 17 after kicking her husband, the mother-in-law angry on ankita lokhande new video viral on social media

नवऱ्याला लाथ मारल्यानंतर सासूने अंकिता लोखंडेला सुनावलं, अभिनेत्रीच्या आईला फोन करत संस्कारही काढले, म्हणाल्या "तुम्ही तुमच्या नवऱ्याला..."

टीव्हीवरील लोकप्रिय शो ‘बिग बॉस’ हा आल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. या शोमधील लोकप्रिय जोडी अंकिता लोखंडे व विकी जैन हे तर या शोमुळे आणखीनच प्रसिद्ध झाले आहेत. या जोडीमधील भांडणं ही प्रेक्षकांसाठी काही नवीन राहिली नाहीत. या जोडीमध्ये अनेकदा भांडणे झाल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहे. अशातच गेले काही दिवस विकी व अंकिता यांच्यात मन्नारावरुन मतभेद सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. अंकिताला मन्नारा व विकी यांच्या मैत्रीमुळे विकीबद्दल असुरक्षितता वाटत असल्याचे दिसून येत आहे.

अशातच या शोमध्ये येत्या वीकेण्ड का वारमध्ये ‘बिग बॉस’च्या घरात पुन्हा एकदा अंकिता व विकीची आई येणार आहे आणि यावेळी विकीच्या आईने केलेल्या एका कृतीमुळे अंकिता तिच्या सासूवर नाराज झाली अस्लयचे पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या घरात अंकिताने विकीला लाथ मारल्याचे प्रकरण चांगलेच गाजले होते. यावर सोशल मीडियावर अनेकांकडून अनेक प्रकाराच्या प्रतिक्रिया आल्या होत्या. यावरच आता विकीच्या आईने तिची प्रतिक्रिया दिल्यानंतर अभिनेत्री आपल्या सासूबाईवर नाराज झाली आहे.

Just 3 month before her dad passed away and it's so disgusting to hear such comments from his mom!

it's so sad to see that in last phase of game she's going through such situations! stay strong babe ????#AnkitaLokhande #BB17 #AnkitaIsTheBoss #BiggBoss17 pic.twitter.com/yQ04CeWH9h

— ???????????????????????????? ???????????????????? ???????? ???? (@RashamiDesaiFC_) January 8, 2024

आणखी वाचा – Bigg Boss 17 : सासूबाईंची वागणूक पाहता अंकिता लोखंडेला बसला धक्का, विकीचेही सूर बदलले, अभिनेत्री म्हणाली, “मला वाटलं तुम्ही…”

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये अंकिताने विकीला लाथ मारल्याबद्दल विकीच्या आईने निराशा व्यक्त केली. या व्हिडीओमध्ये विकीची आई अंकिताला असे म्हणते की, “ज्या दिवशी तू विकीला लाथ मारलीस, मी लगेच तुझ्या आईला फोन केला. मी तिला विचारले की, “तुझ्या पतीशीही तुम्ही असेच वागत होता का? तुम्हीदेखील तुमच्या पतीला अशीच लाथ मारत होतात का?” आणि हे ऐकताच अंकिताने यावर नाराजी व्यक्त केली.

आणखी वाचा – बॉलिवूडमध्ये लगीनघाई! आयरा-नुपूर नंतर ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्रीदेखील अडकणार विवाहबंधनात, तारीखही आली समोर अन्…

यावर अंकिताने सासूला प्रतिउत्तर देत असे म्हटले की, “माझ्या आईला फोन करायची काय गरज होती? माझ्या वडिलांचे निधन झाले आहे आणि अशा गोष्टीत तुम्ही आई-वडीलांना कृपया आणू नका.” विकीच्या आईच्या या वागणुकीमुळे अंकिता तिच्या सासूवर चांगलीच नाराज झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, अंकिताच्या वडिलांचे तिने ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करण्यापूर्वी ऑगस्टमध्ये निधन झाले होते.  

Tags: ankita lokhandebigg bossbigg boss 17Bollywood entertainmentBollywood entertainment newsbollywood newsentertainment newsvikcy jainअंकिता लोखंडेबिग बॉसबिग बॉस १७मराठी बातमीमराठी मनोरंजनमराठी मनोरंजन बातमीविकी जैन
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
marathi actress manava naik shared social media post on mumbai’s infrastructure and pollution see the details

"मुंबई सगळ्यात वाईट शहर कारण...", सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची संतप्त पोस्ट, म्हणाली, "बँडस्टँड, हाजीअलीसारखी ठिकाणं..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.