२०२३ हे वर्ष संपले असून २०२४ या नवीन वर्षाला नुकतंच प्रारंभ झाला आहे. या नवीन वर्षाच्या सुरुवातीस कुणी आपल्या कुटुंबासह सुट्ट्यांच्या आनंद घ्यायला परदेशात जातात तर कुणी आणखी कुठे? अशातच एक मराठमोळे कुटुंब नववर्षाच्या प्रारंभीस देवदर्शनासाठी निघाले आहेत. ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमामुळे आदेश बांदेकर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. या कार्यक्रमामुळे महाराष्ट्राचे लाडके भावोजी म्हणून त्यांना एक वेगळी ओळख मिळाली. (Aadesh Bandekar On Instagram)
आदेश बांदेकर यांचं संपूर्ण कुटुंब सिनेसृष्टीत कार्यरत आहे. आदेश बांदेकर यांच्यासह त्यांच्या पत्नी अभिनेत्री सुचित्रा बांदेकर आणि मुलगा सोहम बांदेकरही उत्तम कलाकार म्हणून काम करत आहेत. सोहम व सुचित्रा यांनी अनेक मालिका, चित्रपटांमधून उत्तम काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. बांदेकर कुटुंबीय सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच काही ना काही पोस्ट करून ते चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच आदेश बांदेकर यांनी शेअर केलेली इंस्टाग्राम पोस्ट साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
आणखी वाचा – “आगीत तेल ओततात पण…”, ‘बिग बॉस’ स्क्रिप्टेड असण्याच्या चर्चांवरुन पुष्कर जोगचा खुलासा, म्हणाला, “त्या घरात…”
बांदेकर कुटुंब नवीन वर्षाच्या मूहूर्तावर देवदर्शनासाठी निघाले आहेत. आदेश यांनी नुकताच त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे त्यांच्या कुटुंबाबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. बांदेकर कुटुंबीय गाणगापुर, अक्कलकोट व तुळजापुर या ठिकाणी देवदर्शनासाठी निघाले असल्याचे म्हटले आहे. आदेश यांनी हा फोटो शेअर करत “प्रवास सहकुटुंब ट्रेनचा.. गाणगापूर, अक्कलकोट, तुळजापूर दर्शनाचा.. योग आनंदयात्रेचा” असं कॅप्शन दिलं आहे.
दरम्यान, आदेश यांनी शेअर केलेल्या फोटोवर मराठीतील अनेक कलाकारांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. त्यांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आदेश बांदेकर शूटिंगमधून वेळात वेळ काढून आपल्या कुटुंबासह नेहमीच एकत्र वेळ घालवत असतात. अशातच यावेळी ते त्यांच्या कुटुंबाबरोबर देवदर्शनासाठी गेलेले पाहायला मिळत आहेत.