Majjacha Adda with Pushkar Jog : छोट्या पडद्यावरील बहुचर्चित व वादग्रस्त शो म्हणजे ‘बिग बॉस’. हिंदीसह मराठी प्रेक्षकांमध्येदेखील या शोविषयी प्रचंड क्रेझ असल्याची पाहायला मिळते. ‘बिग बॉस मराठी’चं पहिलं सीझन तर बरंच गाजलं आणि याच सीझनमधून नावारुपाला आलेला एक अभिनेता म्हणजे पुष्कर जोग. पुष्करची एक वेगळीच बाजू या शोमध्ये पाहायला मिळाली. तसेच त्याची सई लोकूरबरोबर असणारी मैत्री विशेष गाजली. ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या सीझनमध्ये पुष्कर, सई, मेघा यांचं त्रिकुट विशेष चर्चेत आलं होतं. या तिघांची मैत्री आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. विशेषतः पुष्कर-सईचं मैत्रीचं नातं प्रेक्षकांनी खूपच उचलून धरलं. वेळेप्रसंगी या तिघांमध्ये वादही झाले.
अशातच पुष्करने ‘इट्स मज्जा’च्या ‘मज्जाचा अड्डा’या खास मुलाखतीच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी पुष्करला ‘बिग बॉस मराठी’विषयी एक हटके प्रश्न विचारण्यात आला. बिग बॉस च्या घरात असताना स्पर्धकांमध्ये होणारे वाद-विवाद हे बऱ्याचदा खूप टोकाला जातात. हे वाद इतके टोकाला जातात की, ते घरात एकमेकांचे शत्रू म्हणून वावरतात. पण घराबाहेर येताच ते पुन्हा मित्र होतात. तर याच मुद्द्याला घेऊन पुष्करला “प्रेक्षकांना असं वाटतं की, ‘बिग बॉस’ हा शो स्क्रिप्टेड आहे. तर असं खरंच आहे का?” हा प्रश्न विचारण्यात आला.
आणखी वाचा – “तरीही मला रिप्लाय केला नाहीस आणि…”, सई लोकूरवर पुष्कर जोग नाराज, म्हणाला, “लग्नालाही बोलावलं नाही अन्…”
यावर पुष्करने खुलेपणाने उत्तर देत असे म्हटले की, “मी अगदी स्पष्टपणे खुलासा करतो की, ‘बिग बॉस’ हा शो अजिबात स्क्रिप्टेड नाही. खूप लोकांना असंच वाटतं. पण असं काहीच नाही. भांडणामध्ये म्हणजे आगीमध्ये ते (बिग बॉस) तेल ओततात. पण तुम्ही किती स्क्रिप्ट करणार? ‘बिग बॉस’च्या घरात वेगवेगळ्या प्रकारची माणसे येतात. अनिल थत्ते असतील किंवा अभिजीत बिचुकले असतील यांना तुम्ही स्क्रिप्ट कसे करु शकता? आज तुम्ही अभिजीत बिचुकलेंना सांगाल का की आज तुम्हाला हे बोलायचं आहे, याच्याशी भांडायचं आहे. तसं शक्यच नाही आणि ते ऐकणारही नाहीत. आता आमच्यावेळी उषा ताई होत्या. त्यांनाही सांगणं शक्य नाही. जर घरात आमचं कोणाशी भांडण झालं तर त्या व्यक्तीबाबत पाच वाईट गोष्टी सांग असं ‘बिग बॉस’कडून सांगण्यात यायचं. त्यामुळे भांडणं अधिक वाढायची”.
त्यामुळे ‘बिग बॉस’ हा शो अजिबात स्क्रिप्टेड नसून ते दोघांच्या भांडणात आग लावण्याचे किंवा आगीत तेल ओतण्याचे काम करतात असं म्हणत पुष्करने ‘बिग बॉस’ हा शो स्क्रिप्टेड असण्याविषयी खुलासा केला आहे. दरम्यान, ‘मज्जाचा अड्डा’ या खास कार्यक्रमात पुष्करने त्याच्या एकूण प्रवासाविषयी, मराठी मनोरंजन सृष्टीतील गटबाजीबाबत तसेच त्याच्या ‘बिग बॉस’मधील अनुभवाविषयी व त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयीदेखील खुलेपणाने संवाद साधला. त्याचबरोबर त्याला न पटणाऱ्या काही विषयांवर त्याने आपली रोखठोक मतेदेखील व्यक्त केली.