शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

गाणगापूर, अक्कलकोट अन्…; आदेश बांदेकरांचे कुटुंबासह ट्रेनने देवदर्शन, फोटो शेअर करत म्हणाले “आनंदयात्रेचा…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 6, 2024 | 10:26 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Aadesh Bandekar has shared a photo of him leaving for devdarshan with his family

गाणगापूर, अक्कलकोट अन्...; आदेश बांदेकरांचे कुटुंबासह ट्रेनने देवदर्शन, फोटो शेअर करत म्हणाले "आनंदयात्रेचा..."

२०२३ हे वर्ष संपले असून २०२४ या नवीन वर्षाला नुकतंच प्रारंभ झाला आहे. या नवीन वर्षाच्या सुरुवातीस कुणी आपल्या कुटुंबासह सुट्ट्यांच्या आनंद घ्यायला परदेशात जातात तर कुणी आणखी कुठे? अशातच एक मराठमोळे कुटुंब नववर्षाच्या प्रारंभीस देवदर्शनासाठी निघाले आहेत. ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमामुळे आदेश बांदेकर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. या कार्यक्रमामुळे महाराष्ट्राचे लाडके भावोजी म्हणून त्यांना एक वेगळी ओळख मिळाली.  (Aadesh Bandekar On Instagram)

आदेश बांदेकर यांचं संपूर्ण कुटुंब सिनेसृष्टीत कार्यरत आहे. आदेश बांदेकर यांच्यासह त्यांच्या पत्नी अभिनेत्री सुचित्रा बांदेकर आणि मुलगा सोहम बांदेकरही उत्तम कलाकार म्हणून काम करत आहेत. सोहम व सुचित्रा यांनी अनेक मालिका, चित्रपटांमधून उत्तम काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. बांदेकर कुटुंबीय सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच काही ना काही पोस्ट करून ते चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच आदेश बांदेकर यांनी शेअर केलेली इंस्टाग्राम पोस्ट साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

View this post on Instagram

A post shared by Aadesh Bandekar (@aadesh_bandekar)

आणखी वाचा – “आगीत तेल ओततात पण…”, ‘बिग बॉस’ स्क्रिप्टेड असण्याच्या चर्चांवरुन पुष्कर जोगचा खुलासा, म्हणाला, “त्या घरात…”

बांदेकर कुटुंब नवीन वर्षाच्या मूहूर्तावर देवदर्शनासाठी निघाले आहेत. आदेश यांनी नुकताच त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे त्यांच्या कुटुंबाबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. बांदेकर कुटुंबीय गाणगापुर, अक्कलकोट व तुळजापुर या ठिकाणी देवदर्शनासाठी निघाले असल्याचे म्हटले आहे. आदेश यांनी हा फोटो शेअर करत “प्रवास सहकुटुंब ट्रेनचा.. गाणगापूर, अक्कलकोट, तुळजापूर दर्शनाचा.. योग आनंदयात्रेचा” असं कॅप्शन दिलं आहे.

आणखी वाचा – बायकोला इन्स्टाग्रामवर अनफॉलो करण्यावरुन रंगल्या चर्चा, पुष्कर जोगने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाला, “आयुष्यात अडचणी येतात आणि…”

दरम्यान, आदेश यांनी शेअर केलेल्या फोटोवर मराठीतील अनेक कलाकारांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. त्यांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आदेश बांदेकर शूटिंगमधून वेळात वेळ काढून आपल्या कुटुंबासह नेहमीच एकत्र वेळ घालवत असतात. अशातच यावेळी ते त्यांच्या कुटुंबाबरोबर देवदर्शनासाठी गेलेले पाहायला मिळत आहेत.

Tags: सूचित्रा बांदेकरसोहम बांदेकरमराठी अभिनेतामराठी अभिनेत्रीमराठी मनोरंजनआदेश बांदेकरAadesh Bandekarentertainment newsmaathi actressmarathi actormarathi actressmarathi entertainmentMarathi newssoham bandekarsuchitra bandekar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Next Post
(hollywood actor actor christian oliver dies along with two daughters in caribbean plane crash

सुप्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याचा दोन लेकींसह विमान अपघातात धक्कादायक मृत्यू, हृदय पिळवटून टाकणारी घटना, फिरायला गेला होता अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.