शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 : अंकिता लोखंडे व विकी जैन यांच्या नात्यात तिसरी व्यक्ती?, विकी व सना खानच्या ‘त्या’ व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, नेटकरी म्हणाले, “ही अंकिताचा संसार…”

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 23, 2023 | 12:18 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
bigg boss 17 netizens criticised on viral video of vicky jain and sana raees khan

Video : अंकिता लोखंडे व विकी जैन यांच्या नात्यात तिसरी व्यक्ती?, व्यक्ती, विकी व सना खानच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडीओमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण, नेटकरी म्हणाले, "ही अंकिताचा संसार…”

Bigg Boss 17 : बिग बॉस’च्या यंदाच्या १७ व्या पर्वात आलेल्या जोड्यांमध्ये प्रेमापेक्षा अधिक वेळ संघर्षच पहायला मिळाला आहे. या जोड्यांपैकी एक लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेत्री अंकिता लोखंडे व तिचा पती विकी जैन. हे दोघे नेहमीच काहीना काही कारणावरून चर्चेत राहतात. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमुळे विकी चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये तो सना रईस खानचा हात धरताना दिसत आहे. (Vicky Jain And Sana Raees Khan Viral Video)

या व्हायरल व्हिडीओमध्ये ते दोघे घराच्या परिसरात बसलेले आहेत आणि एकमेकांशी कुठल्या तरी विषयावर गप्पा मारत आहेत. त्यानंतर या व्हिडीओमध्ये विकी व सना एकमेकांचा हात धरत आहेत. ते दोघे गप्पांमध्ये इतके मग्न होतात, की बराच वेळ एकमेकांचा हात धरून ठेवतात. दरम्यान त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी त्यांच्यावर अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या व्हिडीओवर प्रेक्षकांनी अनेक नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Chalo . Evidence pic.twitter.com/qnDnr2hpnY

— afme (@joonie_23498) November 21, 2023

आणखी वाचा – “राखी माफीलायक नाही”, आदिल खानने राखी सावंतबाबत केलं मोठं विधान, अभिनेत्री भडकली, म्हणाली, “माझा वापर त्याने…”

विकी व सना यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर दोघांवरही जोरदार टीका होत आहे. या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने कमेंट करत असे लिहिले आहे की, “तुम्ही बोट दिले तर विकी तुमचाही हात धरेल.” तर दुसऱ्या एकाने “सनामध्ये असं काय पाहिलंस्?” म्हणत कमेंट केली आहे. त्याचबरोबर आणखी एका नेटकऱ्याने “सना अंकीताचा संसार मोडत आहे” असं म्हटले आहे.

आणखी वाचा – वाढदिवसानिमित्त अमृता खानविलकरला मिळाल्या नवऱ्याकडून खास शुभेच्छा; आभार मानत म्हणाली, “मागील २० वर्ष…”

दरम्यान गेले काही दिवस अंकिता विकीच्या प्रत्येक वागण्यावर चिडचिड करत आहे. घरातील इतर स्पर्धकांशी त्याची होणारी जवळीकदेखील तिला खटकत आहे. त्यामुळे या व्हायरल व्हिडीओवर अंकिताची काय प्रतिक्रिया असणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. तसेच या व्हिडीओमुळे आगामी काळात त्यांच्यात पुन्हा काही वाद निर्माण होणार का? याकडेसुद्धा प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Tags: bigg boss 17entertainment newsSana Raees Khanvicky jain
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Rahul Deshpande Daughter

राहुल देशपांडेच्या लेकीने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त दिलं खास सरप्राईज, व्हिडीओ पोस्ट करत म्हणाला, "तिने स्वतःच्या हाताने…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.