Bigg Boss 17 : बिग बॉस’च्या यंदाच्या १७ व्या पर्वात आलेल्या जोड्यांमध्ये प्रेमापेक्षा अधिक वेळ संघर्षच पहायला मिळाला आहे. या जोड्यांपैकी एक लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेत्री अंकिता लोखंडे व तिचा पती विकी जैन. हे दोघे नेहमीच काहीना काही कारणावरून चर्चेत राहतात. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमुळे विकी चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये तो सना रईस खानचा हात धरताना दिसत आहे. (Vicky Jain And Sana Raees Khan Viral Video)
या व्हायरल व्हिडीओमध्ये ते दोघे घराच्या परिसरात बसलेले आहेत आणि एकमेकांशी कुठल्या तरी विषयावर गप्पा मारत आहेत. त्यानंतर या व्हिडीओमध्ये विकी व सना एकमेकांचा हात धरत आहेत. ते दोघे गप्पांमध्ये इतके मग्न होतात, की बराच वेळ एकमेकांचा हात धरून ठेवतात. दरम्यान त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी त्यांच्यावर अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या व्हिडीओवर प्रेक्षकांनी अनेक नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Chalo . Evidence pic.twitter.com/qnDnr2hpnY
— afme (@joonie_23498) November 21, 2023
विकी व सना यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर दोघांवरही जोरदार टीका होत आहे. या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने कमेंट करत असे लिहिले आहे की, “तुम्ही बोट दिले तर विकी तुमचाही हात धरेल.” तर दुसऱ्या एकाने “सनामध्ये असं काय पाहिलंस्?” म्हणत कमेंट केली आहे. त्याचबरोबर आणखी एका नेटकऱ्याने “सना अंकीताचा संसार मोडत आहे” असं म्हटले आहे.
आणखी वाचा – वाढदिवसानिमित्त अमृता खानविलकरला मिळाल्या नवऱ्याकडून खास शुभेच्छा; आभार मानत म्हणाली, “मागील २० वर्ष…”
दरम्यान गेले काही दिवस अंकिता विकीच्या प्रत्येक वागण्यावर चिडचिड करत आहे. घरातील इतर स्पर्धकांशी त्याची होणारी जवळीकदेखील तिला खटकत आहे. त्यामुळे या व्हायरल व्हिडीओवर अंकिताची काय प्रतिक्रिया असणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. तसेच या व्हिडीओमुळे आगामी काळात त्यांच्यात पुन्हा काही वाद निर्माण होणार का? याकडेसुद्धा प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.