सोशल मीडियावर कलाकार चर्चेत असतात याशिवाय त्यांची मुलंही लोकप्रिय असतात. प्रेक्षक कलाकार मंडळींवर जितकं प्रेम करतात तितकंच प्रेम ते त्यांच्या मुलांवरही करतात. अशातच गायक, संगीतकार राहुल देशपांडेची मुलगी रेणुका देशपांडे सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल असते. तिचे अनेक रील व्हिडीओही सोशल मीडियावर पाहणं प्रेक्षकांना रंजक ठरतं. (Rahul Deshpande Daughter)
रेणुका तिच्या गोड आवाजामुळे व तिच्यातील टॅलेंटमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस पडते. तिचे अनेक व्हिडीओ राहुल त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करत असतो. राहुल व त्याच्या लेकीचं बॉण्डिंग नेहमीच सोशल मीडियावरून पहायला मिळतं. अशातच राहुलने नुकताच रेणुकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावरून शेअर केला आहे. राहुल देशपांडे व त्याच्या पत्नी नेहा देशपांडे यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शूट करण्यात आलेला हा व्हिडीओ आहे.
राहुलने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये रेणुकाने सरप्राईज दिलेलं पाहायला मिळत आहे. आई वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त रेणुकाने त्यांच्यासाठी स्वतःच्या हाताने सुंदर असं ग्रीटिंग कार्ड बनवलं आहे. व्हिडिओमध्ये असं पाहायला मिळत आहे की, रेणुका ते ग्रीटिंग कार्ड तिच्या आई वडिलांजवळ आणून देते. ते पाहिल्यानंतर दोघांच्याही चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहताना पाहायला मिळत आहे. लेकीने स्वतःच्या हाताने बनवलेलं सरप्राईज पाहून राहुल व त्याची पत्नी खुश झाले आहेत.
राहुलने हा व्हिडीओ त्याच्या इंस्टग्राम अकाऊंटवरून शेअर करत, “मनमोहक क्षण, आमच्या लहान मुलीने लग्नाच्या वाढदिवसादिवशी दिलं मनं हेलावणारं सरप्राईज. प्रेम व आनंदाने भरलेले हस्तनिर्मित ग्रीटिंग कार्ड”. त्याच्या या पोस्टवर अनेकांनी रेणुकाचं कौतुक करत दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अनेक कलाकार मंडळींनीही या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. तर रेणुकाच्या या व्हिडिओवर तिच्या चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.